पुणे शहरात आज लसीकरण राहणार बंद ; लसीचा पुरवठा न झाल्याने लसीकरण थंडावले

गेल्या आठवड्यात महापािलकेची लसीकरण माेहीम मंदावली आहे. केंद्र सरकार आणि त्यानंतर राज्य सरकारकडून लसीचा पुरवठा पुरेशा प्रमाणात न झाल्याने लसीकरण कमी झालेे आहे. गेल्या आठवड्यात तीन दिवस लसीकरण बंद राहीले हाेते. रविवारपासून पुन्हा लासीकरण सुरू झाले असले तरी लसीचा मागणीच्या तुलनेत कमी पुरवठा हाेत आहे.

  पुणे : महापालिकेच्या लसीकरण विभागाच्या नियाेजनामुळे लस वाया जाण्याचे प्रमाण हे १. ४ टक्क्यापर्यंत नियंत्रित ठेवण्यात यश आले आहे. तर लसीचा पुरवठा कमी हाेत असल्याने गेल्या काही दिवसांत शहरातील लसीकरण माेहीम थंडावली आहे. लसीचा पुरवठा न झाल्याने आज पालिका हद्दीतील लसीकरण बंद राहणार आहे.

  लसीकरणाच्या प्रक्रीयेत पाच टक्के लस वाया जाऊ शकते असे गृहीत धरले जाते. पुणे महापािलकेने एकुण लसीचा हाेणारा पुरवठा लक्षात घेऊन लस वाया जाऊ नये याकरीता नियाेजन केले. लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांना याबाबतच्या सुचना दिल्या हाेत्या. त्यामुळे पुणे महापािलकेच्या क्षेत्रात लस वाया जाण्याचे प्रमाण हे १. ४ टक्क्यापर्यंत नियंत्रित ठेवण्यात आराेग्य विभागाला यश आले आहे. लसीच्या एका बाटलीतून दहा जणांना लसीचा डाेस देता येताे. लसीकरण केंद्रांत एकाचवेळी दहा नागरीक लस घेण्यासाठी उपस्थित असतील तेव्हाच नवीन बाटलीचा वापर सुरू करावा, अशा सुचना दिल्या गेल्या हाेत्या. यामुळे लस वाया जाण्याचे प्रमाण खाली आले आहे.

  दरम्यान, गेल्या आठवड्यात महापािलकेची लसीकरण माेहीम मंदावली आहे. केंद्र सरकार आणि त्यानंतर राज्य सरकारकडून लसीचा पुरवठा पुरेशा प्रमाणात न झाल्याने लसीकरण कमी झालेे आहे. गेल्या आठवड्यात तीन दिवस लसीकरण बंद राहीले हाेते. रविवारपासून पुन्हा लासीकरण सुरू झाले असले तरी लसीचा मागणीच्या तुलनेत कमी पुरवठा हाेत आहे.

  लसीची बाटली फाेडल्यानंतर ठराविक वेळेतच लस देणे आवश्यक असते. एका बाटलीतून दहा जणांना डाेस दिले जातात. यामुळे लस वाया जाऊ नये याकरीता काळजी घेण्याचे आणि त्याबाबतची कार्यवाही करण्याच्या सूचना लसीकरण केंद्रांतील कर्मचाऱ्यांना दिल्या हाेत्या. त्यामुळे लस वाया जाण्याचे प्रमाण आहे. जे १. ४ टक्के एवढे प्रमाण दिसते. लसीकरणाची वेळ संपत आल्यानंतर शिल्लक राहीलेली लस वाया जाते त्यामुळे हे प्रमाण दिसत आहे. लसीकरणाची वेळ संपण्याच्यावेळेस केंद्रांत दहा पेक्षा कमी लाेक असतील तर नाईलाजास्तव नवीन बाटली फाेडावी लागते. त्यामुळे लस शिल्लक राहून ती वाया जाते.

  - सुर्यकांत देवकर, लसीकरण अधिकारी , पुणे महापािलका

  – आकडेवारी काय सांगते
  * आराेग्य सेवक कर्मचारी : पहीला डाेस – ५९ हजार ३७४ आणि दुसरा डाेस – ४५ हजार ९७५
  * फ्रंटलाईन वर्कर : पहीला डाेस- ६८ हजार ६ आणि दुसरा डाेस २४ हजार ८६०
  * ६० वर्षापुढील नागरीक : पहीला डाेस – २ लाख ७६हजार २८३ आणि दुसरा डाेस – १ लाख २९ हजार ९१५
  * ४५ ते ५९ वर्षाचे नागरीक : पहीला डाेस – २ लाख ८३ हजार २५० आणि दुसरा डाेस – ५१ हजार ६२१
  * १८ ते ४४ वयाेगटातील नागरीक : पहीला डाेस – २० हजार ९२
  * शहरात एकुण दिलेल्या डाेसची संख्या : ९ लाख ५९ हजार ३७६