पुणे शहरात लस नागरिकांच्या प्रतिक्षेत! ; नवीन नियमामुळे पुण्यात गोंधळ,तीन दिवसांपासून लसीकरण माेहीम होती ठप्प

लस उपलब्ध नसल्याने गेल्या तीन दिवसांपासून शहरातील लसीकरण मोहीम ठप्प झाली होती. मंगळवारी साडे सात हजार कोविशिल्ड आणि अडीच हजार कोव्हॅक्सिन लसीचा पुरवठा झाला. यामुळे बुधवारी पुन्हा शहरातील लसीकरण सुरू झाले.

    पुणे : केंद्र आणि राज्य सरकारकडून सातत्याने बदलल्या जाणाऱ्या नियमांमुळे लसीकरण माेहीमेतील सावळा गाेंधळ सुरूच राहीला आहे. यामुळे बुधवारी लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांना नागरीकांची प्रतिक्षा करण्याची वेळ आली. तर महापािलका आयुक्तांनी लसीकरणाच्या संदर्भात काढलेल्या आदेशाचे पडसाद उमटू लागले आहेत.

    लस उपलब्ध नसल्याने गेल्या तीन दिवसांपासून शहरातील लसीकरण माेहीम ठप्प झाली हाेती. मंगळवारी साडे सात हजार काेविशिल्ड आणि अडीच हजार काेव्हॅक्सिन लसचा पुरवठा झाला. यामुळे बुधवारी पुन्हा शहरातील लसीकरण सुरू झाले. परंतु, केंद्र आणि राज्य सरकारडून लसीकरणासंदर्भात नियमांत बदल केला गेल्याचा परीणाम बुधवारी लसीकरणावर पडला. पहीला डाेस घेतल्यानंतर ८४ दिवसानंतरच दुसरा डाेस देण्यात यावी असे आदेश महापािलकेला मिळाले हाेते. त्यानुसार बुधवारी शहरातील ७२ लसीकरण केंद्रांवर लसीकरणाचे काम करणाऱ्यांना नागरीकांची वाट पाहण्याची वेळ आली. लसीकरणासाठी नागरीकांनी गर्दी केली हाेती, परंतु, दुसरा डाेस हा पहील्या डाेसनंतर ८४ दिवसानंतरच दिला जाणार असल्याचे त्यांना समजल्याने नागरीकांना परत जावे लागले. साडे सात हजारापैकी एक हजाराच्या आसपासच नागरीकांना लस दिली गेल्याचा अंदाज आराेग्य विभागाने व्यक्त केला.