पुण्यात पुन्हा लस तुटवडा; आज केवळ सहा ठिकाणी मिळणार लस

कोव्हॅक्सिनही केवळ सहाच केंद्रावर उपलब्ध आहे. यातील प्रत्येक केंद्राकडे लसीचे२०० डोस उपलब्ध असल्याची माहिती, पुण्याच्या महापौरांनी दिली आहे. त्यामुळे, पुण्यात आजही लसीकरणाचा वेग मंदावलेलाच दिसणार आहे.

    पुणे : कोरोना महामारीला प्रतिबंधित करण्यासाठी लसीकरण मोहीम देशभरात सर्वत्र वेगाने सुरु आहे. मात्र वेगवान लसीकरणामुळे देशभरातील अनेक राज्यांमध्ये लसींचा तुटवडा जाणवत आहे. लसीकरणात अव्वल असलेल्या पुण्यातही लशीचा मोठा तुटवडा असून आज म्हणजेच सोमवारी पुण्यातील केवळ सहा केंद्रावर लस मिळणार आहे याबाबतची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

    कोविशिल्ड लस उपलब्ध नाही
    पुणे महापालिकेच्या हद्दीतील कोणत्याही लसीकरण केंद्रावर आज कोविशिल्ड लस उपलब्ध नाहीये. तसंच कोव्हॅक्सिनही केवळ सहाच केंद्रावर उपलब्ध आहे. यातील प्रत्येक केंद्राकडे लसीचे२०० डोस उपलब्ध असल्याची माहिती, पुण्याच्या महापौरांनी दिली आहे. त्यामुळे, पुण्यात आजही लसीकरणाचा वेग मंदावलेलाच दिसणार आहे.