पुण्यामध्ये चिनी वस्तूंची तोडफोड

पुणे: चिनी वस्तूंवर बहिष्कार टाका, स्वदेशीचा स्वीकार करा, चिनी वस्तू टाळा, अशा वेगवेगळ्या घोषणा देत सोमवारी ब्राह्मण महासंघाने चिनी वस्तूंची तोडफोड करीत बहिष्कार घातला. चीनमधून कोरोनाचा फैलाव

पुणे:  चिनी वस्तूंवर बहिष्कार टाका, स्वदेशीचा स्वीकार करा, चिनी वस्तू टाळा, अशा वेगवेगळ्या घोषणा देत सोमवारी ब्राह्मण महासंघाने चिनी वस्तूंची तोडफोड करीत बहिष्कार घातला. चीनमधून कोरोनाचा फैलाव झाला आणि जगभरात त्याचा प्रादुर्भाव वाढला. या पार्श्वभूमीवर चिनी वस्तूंच्या निषेधार्थ महासंघाच्या प्रतिनिधींनी आंदोलन केले. सोशल डिस्टन्सचे नियम पाळून ७२ ठिकाणी हे आंदोलन पार पडले. स्वदेशीचा स्वीकार करून चिनी वस्तूंवर भारतीय नागरिकांनी बहिष्कार टाकावा, यासाठी बाह्मण महासंघाकडून  कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे चिनी वस्तू फोडून आंदोलन करण्यात आले. यावेळी महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे आणि प्रतिनिधी उपस्थित होते. स्वदेशी वापरा, चिनी वस्तू टाळा, असा संदेश दिला गेला. काही चिनी वस्तूंवर प्रतीकात्मकपणे बहिष्कार टाकला.याविषयी महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले की, चीनने कोरोना संपूर्ण जगात पसरवला आहे. तसेच सध्या चीनचा सर्व देशांशी काही ना काही वाद सुरू आहे. भारताशी त्याचे वाद सुरू आहेत. त्यामुळे भारतीय नागरिकांनी एकत्र येऊन चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला पाहिजे, त्यासाठीच आम्ही ही जनजागृती केली. महासंघाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात हे आंदोलन केले. नागरिकांनी आत्मनिर्भर बनून भारतीय वस्तूंचा स्वीकार करावा, त्या विकत घ्याव्यात. चीनने संपूर्ण जगाला कोरोनाच्या विळख्यात आणले. म्हणून या देशाच्या सर्व वस्तूंवर भारतातील नागरिकांनी बहिष्कार टाकावा यासाठी आम्ही जनआंदोलन छेडले आहे. आम्ही महाराष्ट्रभर चिनी वस्तू न वापरण्यासंदर्भात जनजागृती करणार आहोत, असेही दवे म्हणाले.