बिबवेवाडी भागातील सात वाहनांची तोडफोड

परिसरात भीतीचे वातावरण, आरोपींचा शोध सुरू पुणे : पुण्यातील बिबवेवाडी भागात काल रात्री चौघांनी सात वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

परिसरात भीतीचे वातावरण, आरोपींचा शोध सुरू
पुणे :  
पुण्यातील बिबवेवाडी भागात काल रात्री चौघांनी सात वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी येथील पोकळी वस्ती जवळील बकुळा हॉल परिसरात काल रात्रीच्या सुमारास दुचाकी आणि तीन चाकी अशा सात गाड्या उभ्या होत्या. त्यावेळी चौघे जण तिथे येऊन, काठ्या आणि लोखंडी गजाने त्यांनी या गाड्यांची तोडफोड केली. त्या घटनेनंतर आरोपी तेथून पसार झाले.  स्थानिक नागरिकांनी दिलेल्या तक्रारी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे. अशी माहिती बिबवेवाडी पोलिसांनी दिली.