वाहने घरातच उभी : बँकांचे हप्तेही भरता येईना ; वाहनचालकांचे उत्पन घटले, खर्च वाढला

अत्यावश्यक सेवेतील वाहने धावत आहेत. त्यासोबतच दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा वापर अनेकजण करत आहेत. परंतु, एखाद्या वेळेस वाहनात बिघाड आल्यास गॅरेज बंद असल्याने मोठी पंचायत होत आहे. सध्या वाहनात हवा भरणेही अडचणीचे झाले आहे. अनेकांना आपल्या वाहनाचे सर्व्हिसिंग करायचे आहे.

    पिंपरी : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लावले असून, त्याचा फटका प्रवासी वाहतूक करण्यासाठी वाहने खरेदी करणाऱ्यांनाही बसला आहे. व्यवसायासाठी खरेदी केलेली मोठमोठी चारचाकी वाहने घरीच पडून आहेत. त्यामुळे वाहनचालकांचे उत्पन्न घटले असून, याउलट खर्च वाढला आहे. त्यामुळे हा खर्च भागवायचा कसा, असा प्रश्न भेडसावत आहे.

    जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यानंतर १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून कडक निर्बंध लावण्यात आले. त्यासोबतच आंतरजिल्हा व आंतरबाह्य प्रवासाला निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे टूर्स अँड ट्रॅ्व्हल्सचा व्यवसायही ठप्प आहे. या व्यवसायासाठी अनेकांनी मोठमोठ्या वाहनांची खरेदी केली. परंतु, आता प्रवास बंद असल्याने वाहने घरीच पार्किंग आहेत. त्यामुळे त्यांचे उत्पन्न बंद आहे; परंतु वाहनाचा मेंटेनन्स, कर्जाचे हप्ते भरावे लागत आहेत. शहरात महागड्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा वापर करणारे शौकीन मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, आता त्यांनाही बाहेर पडणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे वाहने घरातच पार्क केलेली आहेत. काहींनी तर दीड महिन्यांपासून वाहन पार्किंगमधून काढलेच नसल्याचे स्थिती आहे.

    अत्यावश्यक सेवेतील वाहने धावत आहेत. त्यासोबतच दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा वापर अनेकजण करत आहेत. परंतु, एखाद्या वेळेस वाहनात बिघाड आल्यास गॅरेज बंद असल्याने मोठी पंचायत होत आहे. सध्या वाहनात हवा भरणेही अडचणीचे झाले आहे. अनेकांना आपल्या वाहनाचे सर्व्हिसिंग करायचे आहे. मात्र, शोरूम बंद असल्याने त्यांना गाडीची सर्व्हिसिंग करता येत नसल्याचे चित्र आहे. गॅरेज आणि शोरूम बंद असल्याने वाहनात काही तांत्रिक बिघाड झाल्यास मोठी अडचण निर्माण होत आहे. काहींची वाहने पंक्चर झाली असून, गॅरेज बंद असल्याने घरीच पडून आहेत. तर काहींना वाहनाची वॉशिंग व सव्र्हिसिंग करायची आहे. मात्र, तेसुद्धा करताना अडचणीचे जात आहे. व्यवसाय ठप्प झाल्याने अनेकांना बँकांचे हप्तेही भरता आलेले नाहीत.

    प्रयत्न करूनही नोकरी मिळाली नाही, त्यामुळे गॅरेज टाकले. व्यवसायात जम बसत असतानाच लॉकडाऊन लागले. आता गॅरेज बंद आहे. भाडे कसे द्यायचे, कर्ज कसे फेडायचे, उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न पडला आहे. गॅरेजमधून चौघांना रोजगार उपलब्ध करुन दिला होता. परंतु, कडक निर्बंधामुळे गॅरेज बंद असल्याने रोजगार गेला आहे. व्यवसायच बंद असल्याने घरखर्च कसा भागवायचा, अशी मोठी समस्या आहे. त्यामुळे कर्ज वाढत आहे. शासनाने गॅरेज मालकांना मदत करण्याची गरज आहे.'

    - देवेंद्र मोरे, गॅरेज संचालक