पंढरपूरमधील दिग्गज नेते सुधाकरपंत परिचारक यांचे निधन

२००९ मध्ये सुधाकरपंत परिचारक यांना पक्षाकडून विधानसभेची उमेदवारी जाहीरही झाली होती. मात्र ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासाठी पंतांनी उमेदवारी मागे घेतली. परंतु मोहिते पाटलांना पराभवाचा सामना करावा लागला. सुधाकरपंत परिचारक हे अनेक वर्ष राष्ट्रवादीचे आमदार होते. सुधाकरपंत परिचारक यांनी २५ वर्ष महाराष्ट्र विधानसभेची आमदारकी भूषवली होती.

पंढरपूर : पंढरपूरचे माजी आमदार आणि दिग्गज नेते सुधाकरपंत परीचारक यांचे सोमवारी (१७ ऑगस्ट) रात्री ११.३० वाजताच्या सुमारास पुण्यात निधन झाले. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर गेल्या आठ दिवसांपासून उपचार सुरु होते. श्वसनाचा त्रास सुरू झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी पुण्यातील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु काल सकाळपासूनच त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास वाढल्याने त्यांनी पुण्याच्या सह्याद्री रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

सुधाकरपंत परिचारक हे एस. टी. महामंडळाचे माजी अध्यक्ष होते. एस. टी. महामंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय सुधाकरपंत परिचारक यांचे दुःखद निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली…!त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. अशा शब्दांत एस. टी. महामंडळाकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

२००९ मध्ये सुधाकरपंत परिचारक यांना पक्षाकडून विधानसभेची उमेदवारी जाहीरही झाली होती. मात्र ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासाठी पंतांनी उमेदवारी मागे घेतली. परंतु मोहिते पाटलांना पराभवाचा सामना करावा लागला. सुधाकरपंत परिचारक हे अनेक वर्ष राष्ट्रवादीचे आमदार होते. सुधाकरपंत परिचारक यांनी २५ वर्ष महाराष्ट्र विधानसभेची आमदारकी भूषवली होती.

परिचारक यांनी २०१९ मध्येही शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. गेल्या दहा वर्षांच्या काळात सुधाकरपंत निवडणुकांपासून लांब राहिले. पंचाहत्तरी गाठल्यानंतर इतरांना संधी देण्यासाठी सुधाकरपंतांनी ‘बॅक टू पॅव्हेलियन’ करणं पसंत केलं होतं.