पाहुणेवाडीच्या सरपंचपदी विभावरी यादव

पाहुणेवाडी गावची पंचवार्षिक निवडणूक जानेवारी २०२१मध्ये होऊन जयकुमार भगवानराव तावरे यांची सरपंचपदी निवड झाली होती, परंतु मे मध्ये सरपंच जयकुमार तावरे यांचे निधन झाल्यापासून पद रिक्त होते .रिक्त सरपंचपदाच्या निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती गायकवाड यांनी ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बोलाविली होती .

    बारामती: पाहुणेवाडी(ता.बारामती) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विभावरी सचिन यादव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.पाहुणेवाडी गावची पंचवार्षिक निवडणूक जानेवारी २०२१मध्ये होऊन जयकुमार भगवानराव तावरे यांची सरपंचपदी निवड झाली होती, परंतु मे मध्ये सरपंच जयकुमार तावरे यांचे निधन झाल्यापासून पद रिक्त होते .रिक्त सरपंचपदाच्या निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती गायकवाड यांनी ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बोलाविली होती . यावेळी सरपंचपदासाठी विभावरी सचिन यादव यांचा एकमेव अर्ज आला होता.त्यामुळे निवडणूक अधिकारी स्वाती गायकवाड यांनी त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली .सभेचे संयोजन ग्रामसेवक कांतीलाल काळाणे यांनी केले. सरपंचपदी निवड होताच त्यांनी दिवंगत सरपंच स्व. जयकुमार भगवानराव तावरे यांनी गावासाठी जे स्वप्न पहिले होते, ती अपूर्ण स्वप्न राहिली असतील, ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन यांनी यावेळी दिले .