पोंदेवाडी येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने गाव बंद

मंचर :  आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील मेंगडेवाडी आणि पोंदेवाडी येथे प्रत्येकी एक असे एकुण दोन रुग्ण कोरोनाबाधित आढळुन आले आहेत.त्या पार्श्वभूमीवर गाव बंद ठेवण्यात आले आहे. मेंगडेवाडी येथील ५५ वर्षीय पुरुष व पोंदेवाडी येथील ६५ वर्षीय पुरुष  कोरोनाबाधित आढळुन आले आहेत. शनिवार (दि.१८) रोजी  त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यानुसार त्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.मेंगडेवाडी व पोंदेवाडी ही दोन्ही  गावे सील करण्यात आली असून कोरोना बाधित रुग्णांच्या  संपर्कात आलेल्या व्यक्तींंची माहिती ग्रामपंचायत प्रशासन घेत आहे,अशी माहिती आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी दिली.गावातील नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरु नये. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा.असे आवाहन ग्रामपंचायतींच्या वतीने करण्यात आले आहे.