गावांचा समावेश ८ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये होणार ; आयुक्त विक्रम कुमार यांचे आदेश

महापालिका हद्दीलगतच्या २३ गावांचा समावेश राज्य शासनाने बुधवारी महापालिका हद्दीत केला. याबाबतचे आदेश आल्यानंतर महापालिका प्रशासनाने या गावांमधील दैनंदीन कामकाज व्यवस्थित होण्यासाठी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. ही तेवीस गावे पालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये समाविष्ठ केली आहेत.

  पुणे : महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील दैनंदिन कामकाज व्यवस्थीत होण्यासाठी या गावांचा समावेश महापालिकेच्या ८ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काढले.

  महापालिका हद्दीलगतच्या २३ गावांचा समावेश राज्य शासनाने बुधवारी महापालिका हद्दीत केला. याबाबतचे आदेश आल्यानंतर महापालिका प्रशासनाने या गावांमधील दैनंदीन कामकाज व्यवस्थित होण्यासाठी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. ही तेवीस गावे पालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये समाविष्ठ केली आहेत. संबंधीत क्षेत्रीय कार्यालयांच्या सहाय्यक आयुक्तांनी संबंधीत ग्रामपंचायतीची सर्व कागदपत्रे ग्रामपंचायत कर्मचार्‍याची मदत घेवून त्वरीत ताब्यात घेवून त्याचा अहवाल आयुक्तांना द्यायचा आहे.

  संबंधीत क्षेत्राय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांनी गावांमधील नागरिकांना मुलभूत सेवा सुविधा पुरवण्यासाठी सहाय्यक अधिकार्‍याची नेमणुक करावी, व या सहाय्यक अधिकार्‍याने ग्रामपंचायतमधून तात्पूरत्या स्वरुपात काम पाहण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी काढले आहेत.

  क्षेत्रीय कार्यालये व त्यामध्ये समाविष्ट केलेली गावे
  १) हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालय : (औताडे-हंडेवाडी, होळकरवाडी, शेवाळेवाडी, मांजरी बु.)
  २) वारजे-कर्वेनगर : (कोंढवे-धावडे, कोपरे)
  ३) कोंढवा-येवलेवाडी : (गुजर निंबाळकरवाडी, पिसोळी, वडाचीवाडी)
  ४) नगररस्ता-वडगांवशेरी : (वाघोली)
  ५) धनकवडी-सहकारनगर : (जांभूळवाडी, केळेवाडी, मांगडेवाडी, भिलारवाडी)
  ६) सिंहगड रस्ता : (नांदेड, किरकिटवाडी, खडकवासला, नांदेशी, सणसनगर, नर्‍हे)
  ७) औंध-बाणेर : (म्हाळुंगे, सूस)
  ८) कोथरूड-बावधण : (बावधन ).