भाजी विक्रेत्यांकडून नियमांचे उल्लंघन

वाघोली : (ता. हवेली) वाघोली परिसरामध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना बहुतांश भाजी विक्रेते कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी असलेल्या नियमांकडे दुर्लक्ष करीत आहेत. तोंडावर व्यवस्थित मास्क न लावणे, ग्राहकांची गर्दी झाल्यास सामाजिक अंतर न राखणे, सॅनिटायजर न वापरणे आदी गोष्टी त्यांच्याकडून होत आहे.

 पदपथावर फळ व भाजीपाला विक्रेत्यांचा ताबा 

वाघोली : (ता. हवेली) वाघोली परिसरामध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना बहुतांश भाजी विक्रेते कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी असलेल्या नियमांकडे दुर्लक्ष करीत आहेत. तोंडावर व्यवस्थित मास्क न लावणे, ग्राहकांची गर्दी झाल्यास सामाजिक अंतर न राखणे, सॅनिटायजर न वापरणे आदी गोष्टी त्यांच्याकडून होत आहे. भाजी विक्रेत्यांच्या कृतीबद्दल नागरिकांचा देखील याकडे कानाडोळा होत आहे. भाजी विक्रेत्यांची कृती अशीच राहिली तर वाघोलीतील कोरोनाचा आकडा लवकरच शंभरी पार झाल्याशिवाय राहणार नाही. 
– नागरिकांना पत्करावा लागतो धोका  
भाजी विक्रेत्यांनी पदपथावर ताबा मिळवला असून नागरिकांना पदपथ असताना महामार्गावरून जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत आहे. ग्राहक भाजीपाला पदपथावर गर्दी करत असल्यामुळे पदपथ नागरिकांसाठी की भाजीपाला विक्रेत्यांसाठी असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. भाजीपाला विक्रेत्यांना अन्य ठिकाणी देऊन पदपथ नागरिकांना ये-जा करण्यासाठी खुला करावा अशी मागणी होत आहे. फळ भाजी विक्रेत्यांकडून खरेदी करताना ग्राहकांकडून देखील नियमांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे ग्राहकांनी सुद्धा काळजी घेणे गरजेचे आहे.