सावता महाराजांच्या वंशजांची विष्णू गणेश पिंगळे स्मारकाला भेट

    शिक्रापूर : संत शिरोमणी सावता महाराज यांचे वंशज ह. भ. प. रमेश महाराज वसेकर यांनी नुकतीच हुतात्मा विष्णू पिंगळे स्मारकाला भेट दिली असून, यावेळी तळेगाव ढमढेरे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

    तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथील विष्णू गणेश पिंगळे स्मारक येथे नुकतेच संत शिरोमणी सावता महाराज याचे वंशज ह. भ. प. रमेश महाराज वसेकर यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे पुणे जिल्हा चिटणीस नवनाथ भुजबळ, मानवाधिकार फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद फुलसुंदर, माजी ग्रामपंचायत सदस्य महेश भुजबळ, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख शरद रासकर, ओबीसी काँग्रेसचे शिरुर तालुका सरचिटणीस स्वप्नील शेलार, प्रकाश शेलार, शोभा हिंगणे यांसह आदी उपस्थित होते.

    दरम्यान, संत शिरोमणी सावता महाराज याचे वंशज ह. भ. प. रमेश महाराज वसेकर यांनी हुतात्मा विष्णू पिंगळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यावेळी बोलताना सोलापूर जिल्ह्यातील आरणभेंडी या ठिकाणी संत शिरोमणी सावता महाराज यांचे संजीवन समाधी मंदिर व तीर्थक्षेत्र उभारण्याचे काम सुरु आहे.

    समाजातील प्रत्येक नागरिकांनी त्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन वसेकर यांनी केले. तर संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिराच्या उभारणीसाठी समाज बांधवांकडून मोठी मदत करण्याचे आश्वासन भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे पुणे जिल्हा चिटणीस नवनाथ भुजबळ, मानवाधिकार फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद फुलसुंदर यांनी दिले आहे.