आमदारांच्या फेसबुक ग्रुपवर अश्लील व्हिडीओ ; दोघांवर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

शिक्रापूर : शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या नावाने असलेल्या फेसबुक ग्रुपवर दोन युवकांनी अश्लील व्हिडीओ पोस्ट करून कार्यकर्त्यांची भावना दुखावून फेसबुक ग्रुपची बदनामी केल्याप्रकरणी शिक्रापूर

शिक्रापूर : शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या नावाने असलेल्या फेसबुक ग्रुपवर दोन युवकांनी अश्लील व्हिडीओ पोस्ट करून कार्यकर्त्यांची भावना दुखावून फेसबुक ग्रुपची बदनामी केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची घटना आज सकाळी घडली आहे.

                          मांडवगण फराटा ता. शिरूर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते धनंजय फराटे यांनी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या नावाने आमदार श्री अशोकबापू पवार युवा मंच मांडवगण फराटा या नावाने फेसबुक ग्रुप चालू केलेले असून त्यामध्ये राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते आहेत, आज सकाळी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे शिरूर तालुकाध्यक्ष अमित गव्हाणे यांनी फेसबुक पाहिले असता आबा गोरे नावाने फेसबुक असलेल्या व्यक्तीने आमदार श्री अशोकबापू पवार युवा मंच या फेसबुक ग्रुपवर एक अश्लील व्हिडीओ टाकलेला दिसून आला, यावेळी पाहिले असताना १६ जून रोजी देखील सायंकाळी समाधान गायकवाड या व्यक्तीने देखील सदर फेसबुक ग्रुप वर अश्लील व्हिडिओ टाकला असल्याचे दिसून आले, यावेळी अमित गव्हाणे याने लगेचच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना माहिती दिली, त्यानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा सरचिटणीस पंडित दरेकर, खरेदी विक्री संघाचे सभापती राजेंद्र नरवडे, पंचायत समिती सभापती मोनिका हरगुडे, कार्यकर्ते बाप्पुसाहेब हरगुडे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन गाठले, याबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे शिरूर तालुकाध्यक्ष अमित मोहन गव्हाणे रा. डिंग्रजवाडी ता. शिरूर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी आबा गोरे व समाधान गायकवाड ( पूर्ण नाव पत्ता माहित नाही ) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार हे करत आहे.