वाघोली(ता.हवेली) येथे रस्त्यावर उतरून महाविकास आघाडीचे पदाधिकारी आंदोलन करताना.
वाघोली(ता.हवेली) येथे रस्त्यावर उतरून महाविकास आघाडीचे पदाधिकारी आंदोलन करताना.

-रयत शेतकरी संघटनेचे रस्त्यावर उतरून आंदोलन:महाआघाडी पदाधिकाऱ्यांचे वाघोलीत आंदोलन

वाघोली : दिल्ली या ठिकाणी केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात केलेला कायदा त्वरित रद्द करावा म्हणून देशातील सर्व शेतकऱ्यांनी आंदोलन केले असून आंदोलन दिल्ली याठिकाणी चालू आहे.आंदोलन हे मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात जूलमी कायदा केला आहे,तो कायदा त्वरित रद्द व्हावा यासाठी छेडलेले आहे.

पूर्व हवेलीत आष्टापुर फाटा येथे रस्त्यावर येऊन आंदोलन करताना रयत शेतकरी संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते.

या शेतकरी आंदोलनास वाघोली(ता.हवेली) येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन आंदोलन करून भारत बंदला प्रतिसाद दिला.याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे,माजी आमदार सूर्यकांत पलांडे,पंचायत समितीचे सदस्य सर्जेराव वाघमारे,वाघोलीचे माजी उपसरपंच शांताराम कटके,राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेश सचिव संदीप थोरात,बाळासाहेब सातव गवळी,माजी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंद्रकांत कोलते,शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख राजेंद्र पायगुडे,प्रहार क्रांती आंदोलनाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष धर्मेंद्र सातव,वाडेबोल्हाईचे माजी सरपंच कुशाभाऊ गावडे,दत्तात्रय बेंडावले,संतोष सातव,माजी उपसरपंच कैलास सातव,प्रा.बाळासाहेब सातव,प्रमोद गावडे,साईनाथ वाळके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.यावेळी उपस्थितांनी ५ मिनिटे रास्ता रोको करून आंदोलन केले.

पूर्व हवेलीतील अष्टापुर फाटा येथे आंदोलनाच्या समर्थनामध्ये रयत शेतकरी संघटना भारत बंद मध्ये रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.या आंदोलनामध्ये सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी सहभागी घेवून रयत शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.यावेळी बोलताना रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविप्रकाश (बापूसाहेब) देशमुख म्हणाले की,केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर लादलेले कायदे शेतकरऱ्यांसाठी अत्यंत अन्यायकारक आहे, शेतकऱ्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी हे कायदे रद्द होणे महत्वाचे आहे.याप्रसंगी रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामदास कोतवाल,उपाध्यक्ष सुशिल शिंदे,तालुकाध्यक्ष अनिल कोतवाल,देविदास भोरडे,तालुका कार्यध्यक्ष नितीन इंगळे,संदिपान भोरडे,संदिप शिवले,अनिल तिखोळे,आदी संघटनेचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

भाजपाने शेतकरी वर्गाच्या विरोधातील कायदा रद्द करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करावे.कायदा रद्द साठी देशातील तमाम शेतकरी वर्ग रस्त्यावर उतरून आंदोलन करत असल्याची भाजप सरकारने दखल घ्यावी.अन्यथा देशातील शेतकरी गप्प बसणार नाही.

-रामभाऊ दाभाडे,माजी सदस्य-जिल्हा परिषद पुणे

“आम्ही आमच्या रयत शेतकरी संघटना पुणे जिल्ह्याच्या वतीने देशातील शेतकरी आंदोलनास जाहीर पाठींबा दिला असून जर शेतकऱ्यांच्या विरोधात असलेला कायदा जर या सरकारने त्वरित रद्द केला नाही तर शेतकऱ्यांना एकत्रित करून रस्त्यावर उतरू व तीव्र स्वरूपाचे आंदोलन यापुढे रयत शेतकरी संघटना करेल.”
   -रामदास कोतवाल,अध्यक्ष-रयत शेतकरी संघटना पुणे जिल्हा.