वाघोली ग्रामस्थांचे पीएमआरडीए कार्यालयासमोर आंदोलन

वाढीव नळ पाणीपुरवठा योजनेचे काम तात्काळ सुरु करण्याची मागणी वाघोली : (ता. हवेली) वाघोली गावासाठी वाढीव नळ पाणीपुरवठा योजना पीएमआरडीएकडून दीड वर्षांपूर्वीच मंजूर करण्यात आला होता. या योजनेच्या कामाची

वाढीव नळ पाणीपुरवठा योजनेचे काम तात्काळ सुरु करण्याची मागणी
वाघोली :
(ता. हवेली) वाघोली गावासाठी वाढीव नळ पाणीपुरवठा योजना पीएमआरडीएकडून दीड वर्षांपूर्वीच मंजूर करण्यात आला होता. या योजनेच्या कामाची वर्क ऑर्डर सुद्धा काढली होती. पीएमआरडीए कार्यालयाकडून वर्क ऑर्डर काढून आठ महिने उलटले परंतु अद्यापही या योजनेचे काम सुरु करण्यात आले नाही. वारंवार पाठपुरवा करून देखील वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामाला विलंब होत असल्यामुळे वाघोली ग्रामस्थांच्या वतीने बुधवार (दि.१७ जून) रोजी पीएमआरडीए कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी आयुक्त यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून लवकरच वाढीव नळ पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

-लवकरच पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु होणार
वाघोलीगाव हे उपनगर म्हणून ओळखल्या जाते. पुणे महानगरपालिकाशेजारील अतिशय वेगाने नागरीकरण होणारे गाव आहे. वाघोली गावाची लोकसंख्या दोन ते अडीच लाख आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला मुख्य गावठाण, वाड्या, वस्त्या, नवीन प्लॉटिंगमुळे विकसित होत असलेले भाग, मोठ-मोठे गृहप्रकल्प आहेत. झपाट्याने नागरीकरण वाढत आहे पिण्याच्या पाण्याचा मुख्य प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. कार्यकारी मंडळाने सन २०१८ मध्ये पुणे महानगर प्रदेश विकास (पीएमआरडीए) प्राधिकरणाकडे वारंवार पाठपुरावा करून वाढीव नळ पाणीपुरवठा योजना (२२ कोटी ) वढू डॅमची मंजूर करून घेतली होती. सदर कामाची वर्कऑर्डर आदेश दिनांक १९ सप्टेंबर २०१९ रोजी देण्यात आले होते. वाढीव नळ पाणीपुरवठा योजनेचा कार्यरंभ (वर्क ऑर्डर) आदेश देऊन ७ ते ८ महिने होऊन गेले. परंतु योजनेचे कामकाज अद्यापही सुरू झाले नाही. पीएमआरडीएकडे वारंवार पाठपुराव्यानंतर देखील वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु होत नसल्यामुळे वाघोली ग्रामस्थांच्या वतीने बुधवार (दि. १७) रोजी पीएमआरडीए कार्यालयासमोर सामाजिक अंतर ठेऊन आंदोलन करण्यात आले. पीएमआरडीए आयुक्त विक्रमकुमार यांना निवेदनाद्वारे पाणी पुरवठा योजनेचे काम तात्काळ सुरु करावे यासह विविध मागण्या ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आल्या. आयुक्त विक्रमकुमार व नियोजनकार गीतेकर यांनी पाणीपुरवठा योजनेसह कचरा, डीपी रोड आदि विविध प्रश्नांवर ग्रामस्थांशी चर्चा करून निवेदन स्वीकारले. लवकरच पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु करण्याबरोबरच इतरही प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.  
 

“वाघोली ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करून देखील वाघोलीतील वाढीव नळ पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु करण्यास दिरंगाई होत आहे. केवळ आश्वासने न देता पाणीपुरवठा योजनेसह अन्य प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.”

– संदीप सातव (ग्रामपंचायत सदस्य, वाघोली)