आमदार अशोक पवार
आमदार अशोक पवार

वाघोली:वाघोलीसह २३ गावे महापालिका हद्दीमध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात शासन स्तरावर जोरदार तयारी सुरू झाले असताना २५ जानेवारीला वाघोली महापालिका हद्दीत असेल अशी माहिती आमदार अशोक पवार यांनी दिली. व्हासा (वाघोली हौसिंग सोसायटी असोसिएशन) च्या वतीने बायफ रोड येथील गुलमोहर रेसिडेन्सी येथे रविवारी (दिनांक ६) रोजी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये आमदार पवार यांनी उपस्थितांना माहिती दिली. 

वाघोली:वाघोलीसह २३ गावे महापालिका हद्दीमध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात शासन स्तरावर जोरदार तयारी सुरू झाले असताना २५ जानेवारीला वाघोली महापालिका हद्दीत असेल अशी माहिती आमदार अशोक पवार यांनी दिली. व्हासा (वाघोली हौसिंग सोसायटी असोसिएशन) च्या वतीने बायफ रोड येथील गुलमोहर रेसिडेन्सी येथे रविवारी (दिनांक ६) रोजी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये आमदार पवार यांनी उपस्थितांना माहिती दिली.

राज्यातील तत्कालीन सरकारने पुणे महापालिकेच्या हद्दीत ३४ गावे समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पहिला टप्पा ११ गावे समाविष्ट करण्यात आली. तर उर्वरित वाघोलीसह २३  गावे तीन वर्षात टप्प्याटप्प्याने समाज करण्याचा निर्णय घेतला होता. ही मुदत संपुष्टात आली आहे. दरम्यान शासनाने तेवीस गावे समाविष्ट करण्याच्या हालचालीला वाढल्या आहेत. पुणे शहरालगत लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठी ग्रामपंचायत असणारी वाघोली ग्रामपंचायत महापालिकेत समाविष्ट करण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील ग्रीन सिग्नल दिला आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे वाघोलीतील नागरिक हे पिण्याचे पाणी, रस्ते, कचरा व्यवस्थापन यासारख्या पायाभूत सुविधांपासून वंचित राहत असल्याने आणि ग्रामपंचायतीला हा सारा भार पेलणे अवघड असल्याने आमदार अशोक पवार यांनी वाघोलीचा महापालिकेत समाविष्ट करण्याबाबत मुद्दा गेल्या वर्षभरापासून लावून धरला होता. या पार्श्वभूमीवर १५ दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रसंगी बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये वाघोली हे नव्याने तयार होणाऱ्या हडपसर पालिकेत घ्यावे असे मध्यंतरी चर्चेत आले होते. मात्र तसे न करता पुण्यातच समावेश करण्याबाबत यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.वाघोलीतील वाढता घनकचरा बेकायदेशीर बांधकामे रस्ता कोंडी अशी आव्हाने तयार झालेली आहेत. याचा ताण वाघोली ग्रामपंचायतीवर मोठ्याप्रमाणावर येत आहे. त्यामुळेच वाघोली ग्रामपंचायतीचा पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत होता. वाघोली हौसिंग सोसायटी असोसिएशनच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये २५ जानेवारी रोजी वाघोली महापालिकेच्या  हद्दीत असेल अशी माहिती अशोक पवार यांनी उपस्थितांना दिली. वाघोली महापालिकेत जाणार असल्याने उपस्थितांसह नागरिकांनी स्वागत केले आहे.

-पूर्व हवेलीसाठी स्वतंत्र महापालिकेचा विषय मागे पडला 

पूर्व हवेली मधील मोठ्या गावांना एकत्र करून स्वतंत्र महापालिका तयार करण्याबाबत शासन दरबारी चर्चा चालू असल्याने वाघोलीबाबत निर्णय होत नव्हता मात्र सध्याची स्थिती पाहता स्वतंत्र पालिका तयार करण्यासाठी लागणारा निधी व त्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता स्वतंत्र महानगरपालिकेचा विषय करणे शक्य नसल्याने स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याचा विषय सध्या तरी मागे पडला आहे.

राजेंद्र सातव पाटील(मा.उपसरपंच-वाघोली,तथा अध्यक्ष-वाघोली विकास प्रतिष्ठाण

-वाघोली फक्त कर आकारणीसाठी महानगरपालिकेत नका घेऊ:तर सर्वांगीण विकास हवा:राजेंद्र सातव पाटील

वाघोली जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या असलेले गाव असून तेव्हड्याच अधिक प्रमाणात वाघोलीचा कर आहे.त्यामुळे वाघोलीचा समावेश फक्त कर आकारणीसाठी पुणे महानगरपालिकेने पालिकेच्या हद्दीत घेऊ नये तर वाघोलीत भेडसावणाऱ्या मोठ्या समस्या रस्ते सुधारणा,वाहतूक कोंडी,पाणी,वीज,वाढता कचरा,आदी अनेक प्रश्न,समस्या पुणे महानगरपालिका सोडविणार आहे का? याचे उत्तर प्रथम महानगर पालिकेने वाघोलीकरांना लेखी स्वरूपात द्यावे.मागे ११ गावांचा महानगरपालिकेने समावेश आपल्या पालिकेच्या हद्दीत केला होता त्या गावांचा किती विकास आजपर्यंत झाला?,मग आमच्या मोठे गाव असलेल्या वाघोलीचा सर्वांगीण विकास होणार का? हा मोठा प्रश्न वाघोलीकरांसमोर उभा राहिला आहे.त्यामुळे वाघोली फक्त कर आकारणीसाठी महानगरपालिका हद्दीत घेऊ नका:तर वाघोलीचा सर्वांगीण विकास होईलाच हवा तेव्हा कुठे आमच्या वाघोलीकरांना न्याय भेटेल असे मत प्रतिक्रिया देताना वाघोलीचे माजी उपसरपंच तथा वाघोली विकास प्रतिष्ठाणचे अध्यक्ष राजेंद्र सातव पाटील यांनी व्यक्त केले.