मिळकत करातील विलंब दंडाची रक्कम माफ करा ; राष्ट्रवादी कांग्रेस आणि शिवसेनेची मागणी

पिंपरी : मिळकत कर बिलामधील महापालिका शास्तीची (विलंब दंड) १०० टक्के रक्कम माफ करण्याची मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे आणि शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केली आहे.

पिंपरी : मिळकत कर बिलामधील महापालिका शास्तीची (विलंब दंड) १०० टक्के रक्कम माफ करण्याची मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे आणि शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केली आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने अवैध बांधकामावरील शास्तीकर वगळून मूळ मालमत्ताकराचा भरणा स्वीकृत करण्यास ’विशेष बाब’ म्हणून पिंपरी – चिंचवड महापालिकेस मान्यता दिली आहे.गेली अनेक वर्ष शास्तीकरामुळे नागरिक कर भर नव्हते. परंतु, आता मूळ कर स्वीकारला जाणार आहे. त्यामुळे नागरिक मूळकर भरण्यास तयार आहेत. मात्र, मिळकत करांमध्ये महापालिका शास्तीची रक्कम देखील काही प्रमाणात आहे.त्यासाठी महापालिका शास्तीकर (विलंब दंड) १०० टक्के माफ करुन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी वाघेरे, कलाटे यांनी निवेदनातून केली आहे