आषाढीच्या पायी वारीला वाखरी ग्रामस्थांचा विरोध; मात्र वारीसाठी तडजोड न करण्याची भाजप आध्यात्मिक आघाडीची भूमिका

गेल्या वर्षी मानाच्या पालख्या व पादुका एस टी बसने पंढरपूरला नेण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तत्पूर्वी आळंदी आणि देहू येथील प्रस्थान सोहळ्यांना शासनाने भाविकांची मर्यादा घालून परवानगी दिली होती. मात्र दिलेल्या परवानगीपेक्षा अधिक पटीने भाविकांची गर्दी झाली.

  अनेक वर्षांपासून चालत आलेली आषाढी वारीची परंपरा कोरोनामुळे गेल्यावर्षी पहिल्यांदा खंडित झाली. आषाढीवारीसह, चैत्री, माघी आणि कार्तिकी या चारही वाऱ्या प्रातिनिधिक स्वरुपात साजऱ्या करण्यात आल्या आहेत. यावेळी मात्र पालखी आणि दिंडी प्रमुखांनी पायी वारीला परवानगी देण्याची मागणी केली आहे. येत्या २४ जुलैला आषाढी एकादशीचा सोहळा आहे.
  यंदाही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत झालेली जीवित हानी लक्षात घेत पायीवारीला परवानगी दयायची की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.परंतु भाजपच्या अध्यात्मिक आघाडीने यंदावारीसाठी तडजोड न करण्याची भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे वारीच्या मुक्कामातील एका ठिकाणं असलेल्या वाखरी गावातील ग्रामस्थानी पायीवारीला विरोध केला आहे.

  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाखरी गावातील जवळपास ८०० लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता तर ३० बाधित रुग्णांना आपला जीव गमवावा लागलाआहे.अशास्थित पायी वारी घेतल्यास त्याचा मोठा फटका नागरिकांना बसेल. त्यामुळे पायीवारी घेण्यात येऊ नये अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. आजही वाखरी गावात ३० पेक्षा जास्त कोरोना बाधित आहेत. त्यात तिसऱ्या लाटेचे तज्ज्ञांनी संकेत दिले आहेत वाखरी ग्रामस्थ आणि वारीच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांच्या जीविताची दक्षता पाहता यंदाची आषाढी वारी ही प्रातिनिधिक स्वरुपात साजरी करावी अशी विनंती वाखरी ग्रामस्थांनी देहू, आळंदी संस्थान व पालखी प्रमुखांना पत्र पाठवून केली आहे.

  गेल्या वर्षी मानाच्या पालख्या व पादुका एस टी बसने पंढरपूरला नेण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तत्पूर्वी आळंदी आणि देहू येथील प्रस्थान सोहळ्यांना शासनाने भाविकांची मर्यादा घालून परवानगी दिली होती. मात्र दिलेल्या परवानगीपेक्षा अधिक पटीने भाविकांची गर्दी झाली.

  वारकऱ्यांसाठी पांडुरंग आणि पंढरपूरची वारी हे जणू काही स्वर्ग सुख आहे. मात्र मागच्या वर्षी यांच वारीला कोरोनाचे सावट होते. कोरोनाचे सावट अजून आहेच. त्यामुळे यावर्षी सुध्दा पायी वारीला परवानगी मिळण्याची शक्यता कमीच दिसत आहे. वारी मुळे हजारांच्या संख्येने वारकरी एकत्र येऊन कोरोना संक्रमणाची भीती असल्याने पायी वारीला परवानगी देताना सरकार या सगळ्याचा नक्कीच विचार करेल, अशी भावनाही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

  आषाढी यात्रा सोहळ्याबाबत संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानने पायी सोहळ्याबाबत आमचे मत मागितले होते. आमच्या गावात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव आहे. अजूनही रुग्ण आहेत. सध्या बाधित रुग्ण कमी असले तरी परिस्थिती गंभीरच आहे. असे असताना पायी वारकऱ्यांसोबत पालखी सोहळे काढल्यास ग्रामस्थ, सोहळ्यातील भाविकांच्या जीविताला धोका होऊ शकतो. त्यामुळे गतवर्षी प्रमाणे यंदा ही मोजक्या पालख्या, त्यामध्ये किमान भाविकांना परवानगी द्यावी. कोरोनाचे सर्व नियमाचे पालन करावे, येणाऱ्या पालख्यांना ग्रामपंचायत आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यास सज्ज असल्याचे कळविले आहे. - कविता तुकाराम पोरे सरपंच, ग्रामपंचायत वाखरी, ता. पंढरपूर

  समस्त वारकरी संप्रदायाची तीव्र इच्छा आहे की, यावर्षी पायी वारी झालीच पाहिजे, त्या बाबतीत आम्ही कोणतीही तडजोड स्वीकारणार नाही. निर्बंधांसह का असेना पण मात्र पायी वारी व्हावी. मुख्यमंत्र्यांनी वेळकाढूपणा न करता त्वरित वारकऱ्यासबोत चर्चा करून नियमावली तयार करावी . मात्र पायी वारी झालीच पाहिजे, त्या बाबतीत आम्ही तडजोड करणार नाही. आता यावर सरकार काय भूमिका घेत याकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरेल

  आचार्य तुषार भोसले, भाजप आध्यात्मिक आघाडीची