आंबेगाव तालुक्यातील १४ ग्रामपंचायत व वाडयावस्त्यांवर टॅंकरव्दारे पाणी

भिमाशंकर : आंबेगाव तालुक्यातील १४ ग्रामपंचायत व लगतच्या वाडयावस्त्या यांना दुष्काळ परिस्थितीमुळे पाणी मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. या संबंधित ग्रामपंचायत व वाडयावस्त्यांवर

भिमाशंकर :  आंबेगाव तालुक्यातील १४ ग्रामपंचायत व लगतच्या वाडयावस्त्या यांना दुष्काळ परिस्थितीमुळे पाणी मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. या संबंधित ग्रामपंचायत व वाडयावस्त्यांवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने पिण्यासाठी पाणी पंचायत समिती आंबेगाव यांच्या मार्फत १० पाण्याचे टॅंकर पुरविण्यात आले असुन ६ विहिरी अधिग्रहित केल्या असल्याची माहिती गटविकास अधिकारी जालींदर पठारे यांनी दिली.      

आंबेगाव तालुक्यातील निघोटवाडी, माळीण-आमडे, फलोदे, तिरपाड, थुगाव, पारगाव तर्फे खेड, आहुपे, तळेघर, पिंपरगणे, कुशिरे, गोहे बु., मांदळेवाडी, असाणे व जांभोरी ग्रामपंचायत व वाडया वस्त्यांवर पाणीटंचाई आहे. अशा परिस्थितीत ग्रामपंचायती मार्फत तालुका प्रशासनाकडे नागरिकांना पाण्याचे टॅंकर सुरू करण्याचे प्रस्ताव देण्यात आले. त्यानुसार १४ ग्रामपंचायत व लगतच्या २५ वाडया वस्त्यांवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने नागरिकांना पिण्यासाठी पंचायत समिती आंबेगाव यांच्यामार्फत पाण्याचे शासकीय २ व खाजगी ८ असे एकुण १० टॅंकरने पाणीपुरवठा चालु करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सहा विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.   

दरम्यान पाण्याचे टॅंकर चालू करावे यासाठी गंगापुर खुर्द, पोखरी, पिंपळगाव तर्फे घोडा, साकेरी, गोहे खु., तिरपाड, पहाडदरा, आंबेदरा येथून प्रस्ताव मंजुरीसाठी आले आहेत. लवकरच त्या ठिकाणी पाण्याचे टॅंकर चालू करण्यात येणार आहेत, तसेच ज्या गावांना पाण्यासाठी दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. त्यांनीही आपले प्रस्ताव पंचायत समिती आंबेगाव येथे दयावेत, असे आवाहन गटविकास अधिकारी जालींदर पठारे यांनी केले.