पोंदेवाडी येथील वीजपुरवठा खंडीत झाल्याने पाणीपुरवठ्याची मोटार बंद

मंचर : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पोंदेवाडी येथे निसर्ग चक्रीवादळामुळे विजेचे खांब पडल्याने व तारा तुटल्याने गेल्या चार दिवसापासुन वीजपुरवठा खंडीत झाला आहे.परिणामी

मंचर :  आंबेगाव तालुक्याच्या पूर्व  भागातील पोंदेवाडी येथे निसर्ग चक्रीवादळामुळे विजेचे खांब पडल्याने व तारा तुटल्याने  गेल्या चार दिवसापासुन वीजपुरवठा खंडीत झाला आहे.परिणामी पाणीपुरवठ्याची मोटार बंद असल्याने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा राहिला आहे.वीज वितरण कंपनीने ताबडतोब विजेची जोडणी करुन ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा.अशी मागणी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी केली आहे.

पोंदेवाडी येथे विजेच्या तारांवर झाडे पडल्याने तसेच खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे.वीज पुरवठा खंडित झाला असल्याने सार्वजनिक पाणीपुरवठा करणारी मोटर बंद आहे.त्यामुळे ग्रामस्थांना चार दिवसापासून पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. वीजेअभावी येथील पिठ गिरणी, जनावरांना चारा देण्यासाठी असणारी कडबा कुट्टी ,विजेवर चालणारी उपकरणे बंद  असल्याने  ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.