Water supply to half of Pune city will be cut off today
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी : आज शहरातील निम्या भागात पाणी पुरवठा राहणार बंद

अचानक उद्भवलेल्या दुरुस्तीसाठी आज (ता. २६) निम्या (half) पुणे शहराचा (pune city) पाणी पुरवठा (water supply) बंद (cut off) राहणार आहे. पर्वती जलकेंद्र, वडगाव जलकेंद्र आणि नवीन लष्कर जलकेंद्र अखत्यारीतील तीन हजार मिमी व्यासाच्या रॉ वॉटर पाइपलाइनची दुरुस्ती करायची असल्याने पुणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

  • तीन हजार मिमी व्यासाच्या रॉ वॉटर पाइपलाइनची होणार दुरुस्ती
  • २७ तारखेला होणार नियमित पाणीपरवठा

पुणे : अचानक उद्भवलेल्या दुरुस्तीसाठी आज (ता. २६) निम्या पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद (water supply cut off) राहणार आहे. पर्वती जलकेंद्र, वडगाव जलकेंद्र आणि नवीन लष्कर जलकेंद्र अखत्यारीतील तीनहजार मिमी व्यासाच्या रॉ वॉटर पाइपलाइनची (raw water pipeline) दुरुस्ती (maintainance) करायची असल्याने पुणे शहराच्या (pune city) काही भागाचा (half) पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

पर्वती जलशुद्धीकरण केंद्रास जोडणारी तीन हजार मिमी व्यासाची पाइपलाइन फुटली. त्याची दुरुस्ती करण्यासाठी २६ सप्टेंबरला सकाळी नऊ ते रात्री नऊ दरम्यान होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

सिंहगड रस्ता परिसरातील पर्वती जलशुद्धीकरण केंद्राच्या पाठीमागे रोहन कृतिका सोसायटीच्या मागील भागात असलेल्या रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या कामात जलशुद्धीकरण केंद्रात येणारा पाईप फुटला आहे. त्यामुळे त्याची दुरुस्ती करावी लागणार आहे. त्याचे काम आज सुरू राहणार असून २७ तारखेला पाणीपुरवठा नियमित होणार आहे.

खालील जलकेंद्रांतर्गत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

लष्कर जलकेंद्र अंतर्गत

कोंढवा, हडपसर, महमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, केशवनगर, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी, हांडेवाडी रस्ता, फुरसुंगी, फातिमानगर, एन. आय. बी. एम, संपूर्ण घोरपडी, बी. टी. कवडे रस्ता, भीमनगर, हडपसर औद्योगिक भाग, वैदुवाडी, रामटेकडी, शिवनेरी नगर, मीठानगर, कोंढवा गावठाण, भाग्योदय नगर इत्यादी.

बंडगार्डन जलकेंद्र अंतर्गत- खराडी आणि चंदन नगर

पर्वती जलकेंद्रांतर्गत बिबवेवाडी संपूर्ण परिसर, डायस प्लॉट परिसर, मार्केटयार्ड परिसर, गुलटेकडी परिसर, सहकार नगर परिसर, भवानी पेठ, नाना पेठ, गंज पेठ, महात्मा फुले पेठ, घोरपडी पेठ, मुकुंद नगर, सॅलिसबरी पार्क, महर्षी नगर परिसर, पद्मावती, इंदिरानगर, बालाजी नगर, शिवदर्शन परिसर, तळजाई वसाहत, संभाजी नगर, चव्हाण नगर, धनकवडी, गुलाबनगर, इत्यादी.

वडगाव जलकेंद्र अंतर्गत :

हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, धनकवडी, कोंढवा बु. इत्यादी.

एसएनडीटी पंपिंग अंतर्गत

शिवाजी नगर, सुतारदरा, किष्किंधा नगर, कोथरुड, गोखले नगर, शास्त्रीनगर, पांडव नगर, रेव्हेन्यू कॉलनी, आपटे रस्ता, घुले रस्ता, इत्यादी. या भागात उद्या पाणी पुरवठा होणार नाही. २७ तारखेला नियमित पाणीपरवठा होईल.