सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत , मास्कचा वापर करत ग्रामीण भागात पार पडला लग्नसोहळा

कर्जत : नटलेली नववधू व वरराजा दोघेही तोंडाला मास्क लावून परस्परांना वरमाला घालण्यासाठी सज्ज,मध्यभागी अंतरपाट धरून मास्क लावलेले पुरोहित,त्याच स्थितीत सोशल डिस्टिंग पाळत वधूवराच्या पाठीमागे हार गुच्छ

कर्जत : नटलेली नववधू व वरराजा दोघेही तोंडाला मास्क लावून परस्परांना वरमाला घालण्यासाठी सज्ज,मध्यभागी अंतरपाट धरून मास्क लावलेले पुरोहित,त्याच स्थितीत सोशल डिस्टिंग पाळत वधूवराच्या पाठीमागे हार गुच्छ घेऊन उभे असलेले दोघांचे मामा, पुरोहिताने मंगलाष्ट्क म्हणत  शुभ मंगल सावधान म्हणताच शुभ विवाह पार पडला.या लग्नात संपूर्ण गावकऱ्यांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.घरातील मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला,कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी गर्दी न करता घरातून अक्षता टाकल्या.ग्रामीण भागात सर्व शासकीय नियम पाळीत पार पडलेल्या या आगळ्या वेगळ्या विवाहाची सर्वत्र चर्चा होती.

त्याचे असे झाले तालुक्यातील गोयकरवाडा येथील सोनबा गोयकर यांचा मुलगा प्रवीण याचे शुभमंगल गावातील च शिवाजी पांडुळे यांची सुकन्या सोनालिका हिच्याशी निश्चित झाले.वेळ ठरली वार ठरला मुहूर्त निघाला,सर्व खरेदी झाली पत्रिका ,निमंत्रण सगळे सोपस्कार पार पडले मात्र कोरोनाचे संकट आले आणि लॉकडाऊन सुरू झाले.काही क्षणात पाहिलेली म्युरपंखी स्वप्न हवेत विरतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली.या वेळी डॉ मधुकर काळदाते आणि जेष्ठ नेते  बापूसाहेब काळदाते यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच भाऊसाहेब वाघमोडे ,आरोग्यधिकारी चरण राऊत,सतीश माने,शंकर पांडुळे, बाळासाहेब माने ,नितीन पांडुळे,सौरभ कोळेकर आणि संभाजी गोयकर या सर्वांनी एकत्र येत सर्व शासकीय नियम पाळीत हा विवाह संपन्न करायचे ठरले.अखेर आज दुपारी सोशल डिस्टिंग ठेवीत,काही मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा पार पडला.रमेश मंत्री यांनी या सोहळ्याचे पौराहित्य केले.या सोहळ्यात मंडपाच्या गेटवर हात धुण्यासाठी पाणी व हॅन्ड वॉश तसेच एक जण हातावर सॅनिटायझर लावण्यासाठी व मास्क देण्यासाठी उभा होता.तसेच गावातील प्रत्येकाला अंगणवाडी सेविके कडे  बापूसाहेब काळदाते यांचे हस्ते वधू वरांच्या उपस्थितित सर्व साहित्य देण्यात आले .या मुळे लग्न सोहळ्यातील अनिष्ट गोष्टींना लगाम बसण्या बरोबर अवतंर  खर्च ही वाचला.

 गाेकरवाडा येथील नवरदेव प्रवीण गोयकर व गोयकरवाडा येथील पांडूळे वस्ती वरील सोनालिका पांडूळे याचा शुभविवाह दोन्ही कडील मामा यांच्या साक्षीने विवाह संपन्न झाला. तर इतर सर्व खर्चाला फाटा देत गोयकर व पांडूळे या दोन्ही कुटुंबांनी खंडाळा गोयकरवाडा या ग्रुप ग्रामपंचायतीस मास्क, सॅनिटाइजर नवरदेव प्रवीण व नवरी सोनालिका याच्या हस्ते अंगणवाडी सेविका कुसूम सोलंनकर याच्या कडे सुपूर्द करण्यात आले.