पर्यटनाला गेले आणी मधमाशांनी घेरले.

भोर : वेल्हे तालुक्यातील वांजळे गावातील एकाच कुटुंबातील सातजण सोमवारी राजगड किल्यावर पर्यटनाला गेले आणि मधमाशांनी हल्ला करून त्यांना किरकोळ जखमी केले.पर्यटनाचा बेत त्यांच्या चांगलाच

भोर : वेल्हे तालुक्यातील वांजळे गावातील एकाच कुटुंबातील सातजण सोमवारी राजगड किल्यावर पर्यटनाला गेले आणि मधमाशांनी   हल्ला करून त्यांना किरकोळ जखमी केले.पर्यटनाचा बेत त्यांच्या  चांगलाच अंगलट आला.या सर्वांवर प्राथमिक उपचार करून त्यांना ससून रूग्णालय पुणे येथे पाठवल्याचे करंजावणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदयकीय अधिकारी डॉ.राजेंद्र नांदेडकर यांनी सांगितले.रामचंद्र केसु धरपाले(वय-६०),सुलोचना अंकुश  धरपाले(वय-४५),विमस विजय धरपाले (वय-४०),राहूल एकनाथ धरपाले (वय-१३),शीतल श्रींरग धरपाले (वय-२२),निकिता रामचंद्र धरपाले (वय-२३),पुष्पा लक्ष्मण पवार (वय-१८) अशी जखमींची नांवे आहेत. त्यातील दोघां तिघांना इतर आजाराची लक्षणे दिसल्यामुळे त्या सर्वांना ससून रूग्णालयांत पुढील उपचारा करीता पाठवल्याचे डॉ.नांदेडकर यांनी सांगितले. परंतू तेथे त्यांच्यावर औषधोपचार करून   परत करंजावणे येथे पाठवले. तेथे त्यांना आणखी कांही औषधे देउन घरी सोडले. करोनाचे लॉकडाउन शिथील होताच ही सर्व मंडळी किल्यावर फिरावयास गेली.तेथील सुवेळा माचीवर मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यामुळे सर्वांनी तेथून पळ काढला. घाईघाईत सर्वजण करंजावणे येथील दवाखान्यात गेले.या प्रकरणी डॉक्टरांनी वेल्हे पोलीसांना माहीती दिली आहे.