आषाढी वारी संदर्भात अजित पवारांनी घेतला मोठा निर्णय, काय म्हणाले ? : वाचा सविस्तर

वारीसाठी केवळ 10 पालख्यांनाच बसने जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. पुण्यात आषाढी वारी संदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. दरम्यान लखीसोबत जाणाऱ्या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे.

    पुणे : कोरोनामुळे यंदाही वारीसाठी केवळ 10 पालख्यांनाच बसने जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. पुण्यात आषाढी वारी संदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

    दरम्यान लखीसोबत जाणाऱ्या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. तसेच कोरोनाच्या नियमांचं पालन करणं सर्वांना बंधनकारक आहे. तर देहू-आळंदी पालखीबरोबर 100 जणांना जाण्यास परवानगी देण्यात आली.

    या सर्व पालख्यांना कोरोनाचे नियम पालन करण्याच्या अटीवरच परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती पवार यांनी दिली. मानाच्या पालख्यांमधील वारकरीच मंदिरात जाऊ शकतील. रिंगण आणि रथोत्सवाला निर्बंधासह परवानगी देण्यात आली आहे, असं सांगतानाच इतरांना परवानगी नाही. त्यामुळे कुणीही गर्दी करू नये, असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे.

    तसेचं वारीला पायी जाण्यास परवानगी देण्यात आली नाही. पालखी पायी गेल्यास लोक उत्साहाच्या भरात पालखीभोवती गर्दी करतील. त्यामुळे कोरोना नियमांचा भंग होऊ शकतो. कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. त्यामुळेच पायी जाण्यास परवानगी देण्यात आली नाही, असं अजित पवारांनी सांगितलं.