काय सांगता? बारामतीतल्या चहावाल्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पाठवली शंभर रुपयांची मनीऑर्डर… ; जाणून घ्या कारण

पंतप्रधान हे देशाचे सर्वोच्च पद आहे, त्यांनीही स्वच्छ राहावे, म्हणून माझ्या कमाईतून पंतप्रधन मोदी साहेबांना दाढी दाढी करण्यासाठी मी शंभर रुपये पाठवत आहे. पंतप्रधान हे देशाचे सर्वोच्च नेते अाहेत ते आमचा त्यांच्याबद्दल आदर आहे, त्यांना त्रास देण्याचा आमचा हेतू नाही. परंतु कोरोना साथीच्या आजारात ज्या प्रकारे लोकांच्या समस्या वाढत आहेत, दाढी वाढवून काहीही होणार नाही.

    माळेगाव : गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनेक लोकांचे रोजगार बुडाले आहेत, त्यामुळे नाराज होऊन बारामतीतल्या एका चहावाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर शंभर रुपयांची मनीऑर्डर पाठवून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले आहे.

    अनिल मोरे बारामती शहरातील एका हॉस्पिटल समोर चहाची टपरी चालवतात. गेल्या दीड वर्षात अनेकदा लॉक डाऊन झाल्याने त्यांचा रोजगार बुडाला आहे त्यामुळे कुटुंबाचे पालन-पोषण करणे देखील मुश्कील झाले आहे. त्यामुळे नाराज होऊन त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच रजिस्टर पत्र पाठवून आपल्या मागण्या मांडल्या आहेत. सोबत त्यांनी शंभर रुपयांची मनी ऑर्डर देखील पाठविले आहे मनिऑर्डर पाठवल्याचे कारण विचारले असता, ते म्हणतात की पंतप्रधान मोदी दाढी वाढवून फिरत आहेत. जर त्यांना काहीतरी वाढवायचे असेल तर लोकांसाठी रोजगार वाढवा, लोकांसाठी आरोग्य सुविधा वाढवा, लसीकरण केंद्र वाढवा. अशी दाढी वाढवल्याने लोकांची समस्या सुटणार नाही.

    पंतप्रधान हे देशाचे सर्वोच्च पद आहे, त्यांनीही स्वच्छ राहावे, म्हणून माझ्या कमाईतून पंतप्रधन मोदी साहेबांना दाढी दाढी करण्यासाठी मी शंभर रुपये पाठवत आहे. पंतप्रधान हे देशाचे सर्वोच्च नेते अाहेत ते आमचा त्यांच्याबद्दल आदर आहे, त्यांना त्रास देण्याचा आमचा हेतू नाही. परंतु कोरोना साथीच्या आजारात ज्या प्रकारे लोकांच्या समस्या वाढत आहेत, दाढी वाढवून काहीही होणार नाही.वाढवायची असेल तर लसीकरण केंद्रे वाढवा, लोकांसाठी आरोग्य सुविधा वाढवा, रोजगार वाढवावा, या मागण्यांकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी हा आगळा वेगळा मार्ग स्वीकारला असल्याचे मोरे यांनी सांगितले. त्यांनी मनीऑर्डर सोबत एक पत्र पाठवून कोरोना कालावधीत कालावधीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबाला पाच लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली आहे, याशिवाय पुढील लॉकडाउन लागू केल्यास एका कुटुंबासाठी  ३० हजार रुपये द्यावेत अशी देखील मागणी त्यांनी केली आहे.