MP Supriya Sule honored

राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांची महाराष्ट्राच्या भावी महिला मुख्यमंत्री म्हणून सतत चर्चा होत असते. या चर्चांवर त्यांनी भाष्य केले आहे. मुख्यमंत्रिपद मिळावं यात गैर कसले असा सवाल त्यांनी केला. यावेळी त्यांनी भाजपालाही वैयक्तीक टीका न करण्याचा सल्ला दिला.

    पुणे : राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांची महाराष्ट्राच्या भावी महिला मुख्यमंत्री म्हणून सतत चर्चा होत असते. या चर्चांवर त्यांनी भाष्य केले आहे. मुख्यमंत्रिपद मिळावं यात गैर कसले असा सवाल त्यांनी केला. यावेळी त्यांनी भाजपालाही वैयक्तीक टीका न करण्याचा सल्ला दिला.

    आपली ताकद वाढवण्यासाठी सर्वच पक्ष काम करत असतात, त्यामुळे मुख्यमंत्रिपद मिळावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. राष्ट्रवादी पक्ष भविष्यात वाढावा हे पक्षाच्या नेत्यांना वाटत आहे, फक्त पवार कुटुंबीय म्हणजे राष्ट्रवादी पक्ष नाही आहे, तर हा पक्षाच एक कुटुंब आहे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

    यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणावरही भाष्य केले. बारामतीतून निवडून आले असले तरी महाराष्ट्राशिवाय दिल्ली मिळवणे अशक्य आहे असे सूचक विधान त्यांनी केले. महाराष्ट्र आहे म्हणूनच दिल्लीचं राजकारण आहे. महाराष्ट्रातील कामं, निवडणुका सोडल्या तर दिल्लीत कोणीही विचारणार नाही, असेही त्या म्हणाल्या.