समाविष्ट गावांतील कर्मचाऱ्यांच्या पडताळणी कधी? ; गावांत बाेगस नाेकरभरती झाल्याच्या तक्रारी

नुकतेच महापालिकेच्या हद्दीत २३ गावे समाविष्ठ केली गेली. ही गावे महापालिका हद्दीत समाविष्ठ हाेणार असल्याने या गावांत अस्तित्वात असलेल्या ग्रामपंचायतीच्या कालावधीत बाेगस नाेकर भरती केली गेली. यासंदर्भात काही नागरीकांनी तक्रारी केल्या आहेत. जिल्हा परीषदेने यासंदर्भात एक समिती नियुक्त केली आहे.

    पुणे : समाविष्ट गावांतील कर्मचाऱ्यांच्या पडताळणीसंदर्भात महापािलकेने अद्याप समितीच नियुक्त केली आहे. या गावांत बाेगस नाेकरभरती झाल्याच्या तक्रारी आल्यानंतरही प्रशासनाने काेणतीच कार्यवाही न केल्याने आश्चर्य व्यक्त हाेत आहे.

    नुकतेच महापालिकेच्या हद्दीत २३ गावे समाविष्ठ केली गेली. ही गावे महापालिका हद्दीत समाविष्ठ हाेणार असल्याने या गावांत अस्तित्वात असलेल्या ग्रामपंचायतीच्या कालावधीत बाेगस नाेकर भरती केली गेली. यासंदर्भात काही नागरीकांनी तक्रारी केल्या आहेत. जिल्हा परीषदेने यासंदर्भात एक समिती नियुक्त केली आहे. तर महापािलकेच्या प्रशासनाने बाेगस कर्मचारी भरतीसंदर्भातही चर्चा केली हाेती. या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्णय घेण्याविषयी एक समिती नियुक्त करण्याचेही ठरले हाेते. परंतु अशा प्रकारची काेणतीच समिती अस्तित्वात आलेली नाही. यामुळे ग्रामपंचायतीच्या कालावधीत झालेल्या बाेगस नाेकरभरतीचे काय हाेणार हा प्रश्न अनुत्तरीत राहीला आहे.

    महापालिकेच्या हद्दीत ही गावे समाविष्ठ करण्यासाठी महापािलका आयुक्तांनी सर्व खातेप्रमुखांची बैठक घेतली हाेती. या ग्रामपंचायतीच्या मिळकती, दफ्तर आदी ताब्यात घेताना ग्रामसेवकाकडून माहीती घेण्याच्या सुचना केल्या हाेत्या. ग्रामपंचायतीकडील मनुष्यबळ, त्यांचे आर्थिक व्यवहार, बॅंक खात्याचा तपशील , अनुदान, दस्तएैवज याची पडताळणी करण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग, कामगार कल्याण विभाग, लेखा व वित्त विभागातील अधिकाऱ्याचा समावेश केला जावा असा निर्णय घेतला गेला हाेता. महापालिका हद्दीत ही गावे येण्यापुर्वी किती कर्मचारी हाेते, त्यांचे वेतन कशा पद्धतीने दिले गेले हाेते, त्यांची नियुक्ती कधी केली गेली ? वेतन किंवा मानधन याची बॅंक खात्यातील तपशील तपासणी आदी कामे करणे गरजेचे आहे. ही समिती अद्याप स्थापन केली नसून, बाेगस नाेकर भरतीचा प्रश्न अद्याप प्रलंबित राहीला आहे.