कुठे आहे जिल्हाबंदी? पोलीस आयुक्तांचे अजब तर्क

सरकारने राज्यभरात लॉकडाऊन लागू केला आहे. त्याअंतर्गत जिल्हाबंदीही करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेसाठी प्रशासनाने ई-पास बंधनकारक केला आहे. प्रत्येक जिल्ह्यांच्या सीमांवर, टोल नाक्यांवर पोलीसांनी नाकाबंदी केली आहे. असे असताना अपहरण, खुनाचा प्रयत्नाचे गुन्हे दाखल असणारा आमदार पुत्र साथीदारांसह बिनदिक्कतपणे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात फिरला.

    पिंपरी : कोरोना संकटामुळे जिल्हाबंदी असतानाही गंभीर गुन्ह्यातील आरोपी बिनदिक्कतपणे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात फिरताना पोलीसांनी त्यांना कुठे अडविले नाही का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी अजब तर्क लढविले. कुठे आहे जिल्हाबंदी असा उलट सवाल त्यांनी पत्रकारांना केला. पोलीस सरसकट सर्व वाहनांना अडवत नाहीत. नाकाबंदीही २४ तास सुरू नसते, असे उत्तर त्यांनी दिले.

    सरकारने राज्यभरात लॉकडाऊन लागू केला आहे. त्याअंतर्गत जिल्हाबंदीही करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेसाठी प्रशासनाने ई-पास बंधनकारक केला आहे. प्रत्येक जिल्ह्यांच्या सीमांवर, टोल नाक्यांवर पोलीसांनी नाकाबंदी केली आहे. असे असताना अपहरण, खुनाचा प्रयत्नाचे गुन्हे दाखल असणारा आमदार पुत्र साथीदारांसह बिनदिक्कतपणे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात फिरला. अशा परिस्थितीत त्यांना जिल्ह्यांच्या सीमांवर आणि नाकाबंदीच्या ठिकणी पोलीसांनी अडविले नाही का, असा प्रश्न पत्रकारांनी पोलीस आयुक्तांना विचारला. त्यावर कुठे आहे जिल्हाबंदी असा उलट सवाल त्यांनी पत्रकारांना केला. प्रशासनाने जिल्हाबंदी लागू केलेली नाही. नाकाबंदीही २४ तास सुरू नसते. तसेच नाकाबंदी दरम्यान वाहनांना अडविल्यास केवळ कारण विचारले जाते. सबळ कारण दिल्यास त्यांना पुढे सोडण्यात येते. ई-पासही बंधनकारक नसल्याचे ते म्हणाले. लग्न, अंत्यविधी यासारख्या विधींना उपस्थित राहणे गरजेचे असल्याने नागरिक ई-पास काढतात. आरोपी वाहनांमधून फिरत असताना नाकाबंदी असेलही मात्र, त्यांना कोठे अडविले नसेल विंâवा त्यांनी काही तरी अत्यावश्यक कारणे दाखवली असतील, त्यामुळे त्यांना सोडले असेल, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.