“कोण स्थगिती देतंय तुमच्या बापाची पेंड आहे का काय ; चंद्रकांत पाटलांनी पुन्हा पवारांचा बाप काढला

पुणे : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी विधेयेकांच्या समर्थनार्थ दौंड तालुक्यातील पुणे सोलापूर महामार्गावरील वरवंड ते चौफुला याठिकाणी ट्रॅक्टरची रॅली काढण्यात आली.यावेळी भाजपच्यावतीने बळीराजा सन्मान ट्रॅक्टरपूजन करून ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले.या रॅलीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी पुन्हा पवारांचा बाप काढला. “कोण स्थगिती देतंय,कोण पत्र देतंय काय,तुमच्या बापाची पेंड आहे का काय ? अशा शब्दात शेतकऱ्याच्या राजाला काही कळत नाही, काय असा घणाघात चंद्रकांतदादा पाटील यांनी अजित पवारांवर केलाय.

या रॅलीत चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल बोंडे, हर्षवर्धन पाटील, दौंडचे आमदार राहुल कुल, वासुदेव काळे,बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत ही रॅली काढण्यात आली. या रॅलीसाठी शेकडो ट्रॅक्टरची रांग पुणे-सोलापूर महामार्गावरती भाजपने लावली होती. वरवंडहून निघालेल्या या ट्रॅक्टर रॅलीचा समारोप चौफुला या ठिकाणी झाला आणि तिथं या रॅलीचं रूपांतर सभेमध्ये झालं. सभेत भाषण करताना चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारने कृषी विधेयकांच्या अंमलबजावणीला दिलेल्या स्थगिती बद्दल राज्य सरकारवर टीका केली.