इंदापूरातील अवैध कत्तलखान्यांना अभय कुणाचे?

-अवैधकत्तलखानेकायमचे बंद करण्याची मागणी इंदापूर : नगरपरिषद हद्दीमध्ये लाॅकडाउनच्या काळात खुले आम व राजरोसपणे सुरू असलेले जनावरांचे अवैध कत्तलखाण्यांवर मागील आठवड्यात बारामती पोलीस पथकाने

-अवैध कत्तलखाने कायमचे बंद करण्याची मागणी

इंदापूर : नगरपरिषद हद्दीमध्ये लाॅकडाउनच्या काळात खुले आम व राजरोसपणे सुरू असलेले जनावरांचे अवैध कत्तलखाण्यांवर मागील आठवड्यात बारामती पोलीस पथकाने छापा टाकुन कारवाई करून लाखो रूपयांच्या मुद्देमालासह मोठ्या प्रमाणात गोमांस जप्त केल्याच्या कारवाइने पूणे जिल्ह्यातील अवैध कत्तलखाणे चालकांचे धाबे दणाणले होते. तर इंदापूर नगरपरिषदेने आम्हाला काहीच माहीत नसल्याच्या अविर्भावात कारवाइबाबत कानावर हात ठेवल्याने नगरपरिषदेच्या संशयास्पद भुमीकेबाबत नागरिकांमध्ये उलट-सुलट चर्चा असुन राजकीय हीतसंबध जोपासण्यासाठी  नगरपरिषदेकडून अवैध कत्तलखाणे चालकांना अभय मिळत असल्याचे बोलले जात आहे.

-कत्तलखाण्यातील दुर्गंधीमुळे शहरात रोगराइचा धोका वाढला

वर्षभरातील बारामती गुन्हेअन्वेशन विभागाची ही दुसरी मोठी कारवाई असुन स्वत:च्या आर्थीक व राजकीय स्वार्थासाठी कत्तलखाणे चालकांना अभय देणार्‍यांच्या पायाखालची वाळुच सरकल्याने चौकशीत त्यांची मोठी पंचाइत होण्याची शक्यता आहे. या छाप्यात एकुन १४ लाख ९० हजाराच्या मुद्देमालासह सव्वातीन टण गोमांस, ६ वाहणे व १०३ जीवंत जणावरांची सुटका करत एकूण १७ जणांवर कारवाई करण्यात आल्याने कत्तलखाणे चालकांना व त्यांना पाठबळ देणार्‍यांना मोठा धक्का बसला आहे.लाॅकडाउनच्या काळात कायद्याचे उल्लंघन करून अवैध कत्तलखाणे चालविण्यास आतुन पाठबळ देणार्‍यांची चौकशी खर्‍या अर्थाने पोलीस प्रशासनाकडून होणे गरजेचे आहे. तर इंदापूर शहराच्या मध्यवस्तीत खुलेआमपणे सुरू असलेले जणावरांचे अवैध कत्तलखाणे शहरात कडक बंदोबस्त असताना देखील खुलेआम सुरू कसे राहतात याचे कोडे अद्याप कोणालाही उलगडलेले नाही.

कारवाईचा बडगा उगारणे गरजेचे

इंदापूर नगरपरिषद हद्दीत गेल्या कित्येक वर्षापासुन सुरू असलेले जणावरांचे अवैध कत्तलखाणे बंद करण्यासाठी नगरपरीषदेचे मुख्याधीकारी डाॅ.प्रदिप ठेंगल, नगराध्यक्षा अंकिता शहा, उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवक यांनी मिळुन कडक कारवाई करण्याबाबतची भूमिका घेणे शहराच्या व शहरातील लोकहीताचे आहे. परंतु मुख्याधीकारी हे राजकारण्यांचे हातचे बाहुले असल्याने त्यांना ए सी केबीन सोडुन बाहेर फीरायला जमत नाही.तर सत्ताधारी व विरोधक यांना कत्तलखाण्यांपेक्षा स्वत:चे राजकीय हीत  जोपासण्यात अधिक रस असल्याने कारवाईमुळे मतदार दुखावतील या भावणेने कत्तलखाणे चालकांना राजकीय पाठबळच मिळत असल्याने शहरात आनेक अवैध धंदे फोपावले असुन अशा अकार्यक्षम अधिकार्‍यांवर वरीष्ठ  पातळीवरून कारवाईचा बडगा उगारणे गरजेचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

अवैध कत्तलखाण्यामुळे इंदापूर शहरात घाणीचे साम्राज्य पसरत असुन दूर्गंधीयुक्त उग्र वासाने शहरात लाॅकडाउनच्या काळात रोगराई पसरुन नागरीकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.परंतु नगरपरिषद संबधीत विभाग व मुख्याधीकारी, नगराध्यक्ष यांच्या वेळकाढुपणा मुळे शहरातील नागरिकांना मोठा त्रास सोसावा लागत असुन शहरातील नागरिकांचे आरोग्य सुस्थीतीत रहाण्यासाठी शहराच्या मध्यवस्तीतील अवैध कत्तलखाने तात्काळ कायम स्वरूपी बंद करण्याची मागणी नागरिकामधून होत आहे.