rohit pawar

भारतातील भारत बायोटेक द्वारा निर्मित कोवॅक्सिन या लसीची किंमत जास्त आहे. राज्य सरकारसाठी ४०० रुपये तर खाजगी हॉस्पिटल्ससाठी १२०० रुपये इतकी किंमत या कंपनीने जाहीर केली असून ती सिरमच्या लसीच्या तुलनेत अधिक आहे, ही विचार करण्यासारखी बाब आहे

    भारत बायोटेक’ची लस ही पूर्णपणे भारतात विकसित करण्यात आली आहे. ‘भारत बायोटेक’ची लस पूर्णतः स्वदेशी असून संशोधनासाठी निधी सरकारने उपलब्ध करून दिला, अशी स्थिती असतानाही ‘भारत बायोटेक’ची लस महाग का? असा थेट सवाल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान मोदी सरकारला विचारला आहे. रोहित पवारांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकून मोदी सरकारला विचारणा केली आहे.

    या पोस्टमध्ये ते म्हणत आहेत की आज १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. पण लशीचा साठा उपलब्ध नसल्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण बंद आहे. लशीच्या किंमतीवरून रोहित पवार यांनी सविस्तर खुलासा केला आहे. याबद्दल त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकून मोदी सरकारला विचारणा केली आहे.

    लशीच्या किंमतीमुळे राज्याच्या तिजोरीवर जवळपास ६५०० कोटी रुपयांचा अधिकचा भार पडणार आहे. देशांतर्गत निर्मित होणारी ‘सिरम इन्स्टिट्यूट’ची कोविशील्ड लस व ‘भारत बायोटेक’ची कोवॅक्सिन लस या दोन लसी भारतात प्रामुख्याने वापरल्या जातात. ‘सिरम इन्स्टिट्यूट’ची कोविशील्ड ही इंग्लंडच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठ, एस्ट्रा झेनेका ही परदेशी कंपनी व सिरम इन्स्टिट्यूट ही भारतीय कंपनी या तिघांनी एकत्रित बनवली आहे. तर कोवॅक्सिन ही संपूर्णपणे भारतीय लस आहे, केंद्र सरकारची ‘आयसीएमआर’ ही संस्था, पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) आणि भारत बायोटेक ही भारतीय खाजगी कंपनी या तिघांनी एकत्र येऊन कोवॅक्सिन ही लस बनवली. मात्र परदेशातील कंपन्यांच्या मदतीने लस उत्पादन करणाऱ्या ‘सिरम’ सारख्या कंपनीच्या तुलनेत भारतातील भारत बायोटेक द्वारा निर्मित कोवॅक्सिन या लसीची किंमत जास्त आहे. राज्य सरकारसाठी ४०० रुपये तर खाजगी हॉस्पिटल्ससाठी १२०० रुपये इतकी किंमत या कंपनीने जाहीर केली असून ती सिरमच्या लसीच्या तुलनेत अधिक आहे, ही विचार करण्यासारखी बाब आहे, या मुद्यावर रोहित पवार यांनी बोट ठेवले आहे.

    ‘सिरम’ने परकीय संस्थांसोबत संशोधन केले असल्याने त्यांना रॉयल्टी सारखे बंधने असू शकतात तरीही त्यांच्या लसींची किंमत ३०० रुपये आहे, परंतू ‘भारत बायोटेक’ची लस पूर्णतः स्वदेशी असून संशोधनासाठी निधी सरकारने उपलब्ध करून दिला, अशी स्थिती असतानाही ‘भारत बायोटेक’ची लस महाग का? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थितीत केला.

    ‘भारत बायोटेक’ची लस ही पूर्णपणे भारतात विकसित करण्यात अली आहे. सुरवातीला पुण्यातील National institute of Virology या संस्थेत या लसींचे genome sequencing चे प्राथमिक काम केल्यानंतर ICMR ने हा स्ट्रेन भारत बायोटेककडे सुपूर्द केला. त्यानंतर पुढे ही लस विकसित करणं आणि तिचं मोठ्या प्रमाणात उत्पादन करणं ही कामगिरी ‘भारत बायोटेक’वर सोपविण्यात आली. त्याचबरोबर लसीचे clinical development होतानाही ICMR ने ‘भारत बायोटेक’ला मदत केली. NIV ही संस्था ICMR च्या अखत्यारीत काम करणारी संस्था असून या दोन्ही संस्था सरकारी आहेत, असंही रोहित पवार म्हणाले.