आधी लस परदेशात पाठवायची काय गरज होती? : उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यानी कोरोना लस पुण्यात उत्पादन होत असताना स्थानिक गरज पूर्ण केल्याशिवाय परदेशात पाठवायची काय गरज होती असा सवाल केला आहे पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार यांनी कौन्सिल हॉलला बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

    पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यानी कोरोना लस पुण्यात उत्पादन होत असताना स्थानिक गरज पूर्ण केल्याशिवाय परदेशात पाठवायची काय गरज होती असा सवाल केला आहे. पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार यांनी कौन्सिल हॉलला बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

    किमान ६ कोटी नागरीकांना लसीकरण

    ते म्हणाले की, जुलै-ऑगस्ट महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. त्या अनुषंगाने राज्य सरकारने तयारी सुरु केली आहे. आता यावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्या पूर्वी किमान ६ कोटी नागरीकांना लसीकरण महत्त्वाचे आहे. यासाठी परदेशातून लस आयात करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली तर खूप बरे होईल. भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूट या दोन्ही कंपन्यांकडून लस बनवण्याची क्षमता पाहता, भारतातील लसीकरण व्हायला बराच कालावधी लागेला असेही ते म्हणाले.

    भारतात सुरुवातीला तयार होणारी लस आधी परदेशात पाठवण्याची गरज नव्हती. जर ती पाठवली नसती तर आपल्याला लसींची कमतरता भासली नसती, असे माझे स्पष्ट मत आहे. पण जे झाले ते झाले. मात्र आता किमान तेवढ्याच प्रमाणात केंद्राने लस आयात करण्याची सोय करावी.

    उपमुख्यमंत्री अजित पवार