कोथरूडमधील हॅप्पी कॉलनी परिसरात पोलिस चौकी सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणार :चंद्रकांत पाटील

कोथरूड मधील हॅप्पी कॉलनी हा अतिशय शांत परिसर असून, काही समाजकंटकांकडून सातत्याने इथली शांतता भंग केली जात असल्याचे पोलिस उपायुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. यावर कोथरूड मध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कटीबद्ध असल्याचे उपायुक्तांनी स्पष्ट केले.त

    पुणे : कोथरूडमधील हॅप्पी कॉलनी परिसरात पोलिस चौकी सुरू करण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन आमदार चंद्रकांत पाटील यांनी नागरीकांना दिले आहे.यासंदर्भात हॅप्पी कॉलनी फेडरेशनच्या वतीने भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार पाटील यांना निवेदन देण्यात आले होते. मंगळवारी पाटील यांनी पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्यासमवेत नागरिकांची बैठक आयोजित केली होती. यावेळी नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली.यात प्रामुख्याने पोलिस खात्याकडून परवानगी मिळाल्यावर तेथे लवकरच पोलीस चौकी कार्यान्वित करु असे आश्वासन पोलिस उपायुक्त गायकवाड यांनी दिले.

    या बैठकीत पाटील यांनी कोथरूड मधील हॅप्पी कॉलनी हा अतिशय शांत परिसर असून, काही समाजकंटकांकडून सातत्याने इथली शांतता भंग केली जात असल्याचे पोलिस उपायुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. यावर कोथरूड मध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कटीबद्ध असल्याचे उपायुक्तांनी स्पष्ट केले.तसेच हॅपी कॉलनी व गोसावी वस्तीतील नागरिक मूठभर समाजकंटकांच्या कारवायांना त्रासले आहेत,म्हणून लवकरच हॅपी कॉलनी व गोसावी वस्तीतील शांतताप्रिय नागरिकांची संयुक्त बैठक आयोजित करुन यावर उपाययोजना करण्यात येइल असेही पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी स्पष्ट केले.

    या बैठकीला भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर,स्थानिक नगरसेवक आणि भाजप सरचिटणीस दीपक पोटे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, माधुरी सहस्रबुद्धे,जयंत भावे, फेडरेशन चे अध्यक्ष संजय मिसाळ,सचिव चिन्मय गोगटे, सुरेश मालशे आदी उपस्थित हाेते.