रेल्वेच्या नवीन काॅड लाईनमुळे दौंड रेल्वे स्थानकाचे महत्व कमी होणार?

दौंड : दौंड रेल्वे जंक्शन हे उत्तर भारत व दक्षिण भारताला जोडणारे महत्वाचे स्टेशन आहे ,त्यामुळे दौंड रेल्वे स्थानकाला फार महत्त्व आहे. परंतु आता दौंड शहर दौंड रेल्वे स्थानकाचे महत्व कमी होण्याची चिन्हे आहेत .याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पुण्याहून नवी दिल्ली कडे जाणाऱ्या सर्व सुपरफास्ट गाड्या ह्या नव्याने झालेल्या काॅड लाईनने प्रवाशांचा वेळ वाचण्याकरता रेल्वे प्रशासनाने सुरू केले आहेत

दौंड : दौंड रेल्वे जंक्शन हे उत्तर भारत व दक्षिण भारताला जोडणारे महत्वाचे स्टेशन आहे ,त्यामुळे दौंड रेल्वे स्थानकाला फार महत्त्व आहे. परंतु आता दौंड शहर दौंड रेल्वे स्थानकाचे महत्व कमी होण्याची चिन्हे आहेत .याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पुण्याहून नवी दिल्ली कडे जाणाऱ्या सर्व सुपरफास्ट गाड्या ह्या नव्याने झालेल्या काॅड लाईनने प्रवाशांचा वेळ वाचण्याकरता रेल्वे प्रशासनाने सुरू केले आहेत .त्यामुळे याचा दौंड शहरावर देखील मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे .या काॅड लाईनचे काम होत असताना दौंड शहरातील सर्वच पक्षाच्या पुढाऱ्यांनी आपल्या तलवारी म्यान करून ठेवल्या होत्या की काय ?असा सवाल आता नागरिक करू लागले आहे. या काॅड लाईनमुळे दौंड रेल्वे स्थानकाचे महत्व कमी होणार आहे .आता तरी दौंड शहरातील सर्वच पक्षाच्या राजकीय पुढाऱ्यांनी आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून दौंड शहराच्या विकासाकरिता एकत्र येण्याची गरज आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाला तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे, परंतु लांब पल्ल्याच्या काही गाड्या तरी दौंड रेल्वे स्थानकावरून याव्यात म्हणून आता विविध संघटनांनी प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु हे प्रयत्न निष्प्रभ ठरतील, असे वाटते. वास्तविक पाहता दौंड च्या सर्वच पक्षाच्या राजकीय पुढाऱ्यांनी यापूर्वीच एकत्र येण्याची गरज होती, परंतु एकाही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी किंवा पक्षांनी याबाबत आवाज उठवला नाही व आता याबाबत काही करता येईल का ,याबाबत धावपळ सुरू झाली आहे.

याबाबत दौंड प्रवासी संघटनेचे अध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांच्याशी भ्रमण दूरध्वनीद्वारे संपर्क साधला आसता , ते म्हणाले की ,यामुळे जुन्या दौंड रेल्वे स्थानकावरील हॉकर्स वेंडर रिक्षा चालक यांच्यावर बेकारीची कुर्‍हाड कोसळणार आहे .तरी रेल्वे प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करावा.वरातीमागून घोडे वरातीमागून घोडे हाकलणार का ?असा सवाल जनता आता करू लागली आहे.वास्तविक पाहता या नव्या रेल्वेस्थानकाकडून दौंड शहरात येण्याकरीता चांगला रस्ता नाही .कोणतीही वाहन व्यवस्था नाही ,त्यामुळे भविष्यात याठिकाणी लुटमार होण्याची शक्यता नाकारता येत नाही .याचादेखील रेल्वे प्रशासनाने विचार करणे गरजेचे आहे .