निवृत्तीसाठी पंधरा दिवस उरले असताना पुणे महापालिकेच्या मुख्य विधी अधिकारी मंजुषा इधाटे यांना लाच घेताना अटक

मंजुषा इधाटे गेल्या काही वर्षांपासून पुणे महापालिकेच्या मुख्य विधी अधिकारी म्हणून काम पाहत होत्या. पुणे महापालिकेतील मुख्य विधी अधिकाऱ्याच्या दालनात मंजुषा ५० हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला रंगेहाथ सापडल्या. सध्या विभागाने मंजुषा यांना तुरुंगात टाकले आहे. 

    पुणे: निवृत्तीसाठी अवघे पंधरा दिवस उरले असतानाच पुणे महापालिकेच्या मुख्य विधी अधिकारी मंजुषा इधाटे यांना आज लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. पुणे महापालिकेत या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मंजुषा इधाटे यांना अटक करण्यात आली आहे.

    आज विकास नावाचा व्यक्ती हस्तांतरण अधिकाराच्या मंजुरीसाठी विधी विभागाकडे गेला होता. यावेळी मंजुषा यांनी त्याची मंजुरी देण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली होती. याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गेल्यानंतर विभागाने मंजुषा इधाटे यांना रंगेहाथ पकडण्यासाठी एक सापळा रचला. लाचलुचपत विभागाने रचलेल्या या सापळ्यात मंजुषा रंगेहाथ अडकल्या.