प्रेयसीच्या मदतीने प्रियकराचा घरावर डल्ला ; चाकूचा धाक दाखवून ८ लाखांचे दागिने लंपास

फिर्यादी महिलेचे लखन गोपाळ भोसले (वय ३० रा. निरावागज ता. बारामती जि. पुणे )याच्याशी प्रेमसंबंध होते व त्यास पैशाची अडचण असल्यामुळे त्या दोघांनी मिळून हा बनाव केला असल्याचे निदर्शनास आले आहे.सदरचा गुन्हा उघडकीस आला असून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी सांगितले .

    बारामती : शहरातील फलटण रोड येथे घडलेल्या घटनेबाबत धक्कादायक उघड आला आहे. प्रेयसीच्या मदतीने प्रियकराने घरावर भरदिवसा डल्ला मारत आठ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणाचा छडा लावत बारामती पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.

    याबाबतची माहिती अशी की,बारामती शहरातील फलटण रोड येथील घरात घुसून सासू-सुनेच्या गळ्याला चाकु लावुन रोख रकमेसह आठ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना रविवारी ( दि १४) दुपारी तीन वाजता घडली. या घटनेचा छडा लावत काही तासांतच पोलिसांनी सत्य समोर आणले.

    सदर गुन्हा दाखल झालेनंतर बारकाईने तपास केला असता फिर्यादी महिलेचे लखन गोपाळ भोसले (वय ३० रा. निरावागज ता. बारामती जि. पुणे )याच्याशी प्रेमसंबंध होते व त्यास पैशाची अडचण असल्यामुळे त्या दोघांनी मिळून हा बनाव केला असल्याचे निदर्शनास आले आहे.सदरचा गुन्हा उघडकीस आला असून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी सांगितले .