२४ तासाच्या आत सॅनिटायझरचा ट्रक मिळविण्यात पोलिसांना आले यश चोरटे मात्र झाले फरार

कर्जत : कर्जत तालुक्यातील पाटेवाडी शिवारातुन रात्री २१ लाख रुपयांच्या सॅनिटायझर बाटल्या घेऊन जाणार्‍या ट्रक चार चोरट्यानी ड्रायव्हर ला मारहाण करून पळवून नेला होता. कर्जत पोलिसांनी काही तासात हा

कर्जत : कर्जत तालुक्यातील पाटेवाडी शिवारातुन रात्री २१ लाख रुपयांच्या सॅनिटायझर बाटल्या घेऊन जाणार्‍या ट्रक चार चोरट्यानी ड्रायव्हर ला मारहाण करून पळवून नेला होता. कर्जत पोलिसांनी काही तासात हा ट्रक ताब्यात घेण्यात यश मिळविले असले तरी चारही चोर मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत

         कर्जत तालुक्यातून जाणाऱ्या अहमदनगर सोलापूर महामार्गावरील पाटेवाडी शिवारात काल रात्री साडेसातच्या सुमारास सॅनीटायझर घेऊन जात असणाऱ्या ट्रकला चार चोरट्यानी गतिरोधकाचा फायदा घेत ड्रायव्हरला मारहान करून ट्रक मालासह पळवून नेला होता, सदर ट्रक करमाळा तालुक्यातील जातेगाव चेकपोस्टच्या अलीकडेच पकडण्यात पोलिसांना यश आले असून कर्जत व करमाळा पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नाला हे यश आल्याची माहिती सपोई अमरजीत मोरे यांनी दिली आहे. सदर ट्रक सापडला असून त्यातील संपूर्ण माल मिळाला आहे मात्र सदर चोरून नेणारे चोरटे फरार होण्यात यशस्वी झाले आहेत त्यांचा शोध पोलीस घेत आहेत काल दिनांक १० जून रोजी रात्री सात वाजता पाटेवाडी येथील नजर सोलापूर रस्त्यावरील वळणाचा गैरफायदा घेऊन

मोटासायकल वर आलेले दोन इसम व एक चार चाकी टाटा एसी वाहनातून आलेले दोन इसम असे एकूण चार जणांनी  प्रथम ट्रक थांबवला व गाडीमध्ये चढून ट्रक चालकास मारहाण करत त्याला खाली उतरवून हा मालवाहू ट्रक पळून घेऊन गेले असल्याची फिर्याद मनिवेल पेरूमल वय ५२ वर्ष राहणार मुथ्थुहापट्टी ता जिल्हा नामकल (तामिळनाडू) या ड्रायव्हरने कर्जत पोलिस स्टेशनमध्ये देऊन चार अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशोक लेलँड कंपनीचा मालवाहू ट्रक क्रमांक टी ऐन २८ बी ए १६९४ हा अंदाजे किंमत दहा लाख रुपये व यामध्ये असलेले २१ लाख ९० हजार ६३ रुपये किमतीच्या  सॅनिटायझरच्या २०३७ बाटल्या असा ऐकून ३१ लाख ९० हजार ६३ रुपयांचा ऐवज पळवून नेला होता, घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी भेट दिली होती या 

गुन्हयाचा पुढील तपास पोसई अमरजित मोरे हे करत असून त्यांनी गुन्हा घडल्यापासून २४ तासाच्या आत सदर ट्रक ताब्यात घेतल्याने त्याच्या टीमचे कौतुक केले जात असून हा ट्रक पळवून नेणाऱ्या चारही चोरट्या चा तपास सुरू आहे.