uday samant

पुण्यात एकूण अडीच लाख विद्यार्थी अंतिम वर्षाची परीक्षा देणार आहेत. त्यापैकी दोन लाख विद्यार्थी हे ऑनलाईन परीक्षा देणार आहेत. तर ५० हजार विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा देणार आहेत. अशी माहितीही उदय सामंत यांनी दिली आहे. जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देणार आहेत. त्या सेंटरवार सॅनिटायझेशन केलं जाईल. ग्रामीण भागात ही जबाबदारी जिल्हा परिषदेवर असेल. तर शहरी भागात ही जबाबदारी महापालिकेवर असणार आहे.

पुणे : राज्यातील कोरोनाचा प्रसार (Corona Virus) वाढतच आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. केद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी देशभरातील शाळा (School) उघडण्याबाबतची मार्गदर्शक तत्वे (Guidelies)  जारी केली आहेत. येत्या १५ ऑक्टोबरपासून देशातील शाळा आणि कॉलेज (College) सुरु करण्यासाठी केंद्राकडून परवानगी देण्यात आली आहे. परंतु याबाबत उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना प्रश्न विचारला असता त्यांनी राज्यातील कोरोनाचा प्रसार किती आहे. यावर कॉलेज सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे सांगितले आहे. राज्यात कोरोना परिस्थिती निवळल्याशिवाय कॉलेज सुरु होणार नाही असे स्पष्ट केले आहे.

तसेच पुण्यात एकूण अडीच लाख विद्यार्थी अंतिम वर्षाची परीक्षा देणार आहेत. त्यापैकी दोन लाख विद्यार्थी हे ऑनलाईन परीक्षा देणार आहेत. तर ५० हजार विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा देणार आहेत. अशी माहितीही उदय सामंत यांनी दिली आहे. जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देणार आहेत. त्या सेंटरवार सॅनिटायझेशन केलं जाईल. ग्रामीण भागात ही जबाबदारी जिल्हा परिषदेवर असेल. तर शहरी भागात ही जबाबदारी महापालिकेवर असणार आहे.

परीक्षेसंदर्भात उदय सामंत म्हणाले की, युजीसीने जर आम्हाला मे महिन्यात परीक्षा घ्यायला सांगितली असती तर आम्ही परीक्षा घेतली अशती असे ते म्हणाले.
‘मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारने स्पष्ट भूमिका मांडली आहे. सरकारने दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. आरक्षणाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल,’ असेही उदय सामंत म्हणाले.