तीन किलो गांजा बाळगणाऱ्या महिलेला अटक; निगडी पोलिसांची कारवाई

तीन किलो गांजा जवळ बाळगणा-या महिलेला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि.09) दुपारी तीनच्या सुमारास अण्णाभाऊ साठे वसाहत, निगडी याठिकाणी निगडी पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी पोलीस नाईक विलास केकाण यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पिंपरी : तीन किलो गांजा जवळ बाळगणा-या महिलेला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि.09) दुपारी तीनच्या सुमारास अण्णाभाऊ साठे वसाहत, निगडी याठिकाणी निगडी पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी पोलीस नाईक विलास केकाण यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी महिलेला एमपीडीएस कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक महिलेने 73 हजार 230 रुपयांचा दोन किलो 930 ग्रॅम वजनाचा गांजा जवळ बाळगला होता. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख करीत आहेत. तसेच, भोसरीतील बालाजीनगर परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली. याठिकाणी 19 हजार किंमतीचा 765 ग्रॅम वजनाचा गांजा जवळ बाळगणाऱ्या महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.09) दोनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक घिगे करीत आहेत.