पतीच्या त्रासाला कंटाळून महिलेची बंधाऱ्यात उडी मारून आत्महत्या

क्रांती यांचे वडील अनंत किसनराव थोरात (वय ६२, रा. खेड शिवापूर, ता. हवेली. मूळ रा. बनकरंजा, ता. केज, जी. बीड) यांनी मंगळवारी (दि. २७) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती संदीप नारायण फरताळे (वय २७, रा. ताथवडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप फरताळे याला पहिल्या पत्नीपासून एक मुलगी आहे. त्यानंतर संदीप यांनी क्रांती यांच्याशी लग्न केले. संदीप आणि क्रांती यांना १३ वर्षांचा मुलगा आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

    पिंपरी : पतीकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला आणि मारहाणीला कंटाळून महिलेने बंधाऱ्यात उडी मारून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी येथे (दि. २६) सकाळी केजुदेवी बंधारा, ताथवडे येथे उघडकीस आली. क्रांती संदीप फरताळे (वय ३२, रा. ताथवडे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

    याबाबत क्रांती यांचे वडील अनंत किसनराव थोरात (वय ६२, रा. खेड शिवापूर, ता. हवेली. मूळ रा. बनकरंजा, ता. केज, जी. बीड) यांनी मंगळवारी (दि. २७) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती संदीप नारायण फरताळे (वय २७, रा. ताथवडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप फरताळे याला पहिल्या पत्नीपासून एक मुलगी आहे. त्यानंतर संदीप यांनी क्रांती यांच्याशी लग्न केले. संदीप आणि क्रांती यांना १३ वर्षांचा मुलगा आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.