वेगवान टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू

टेम्पोच्या मागच्या चाकाखाली सापडल्याने पत्नी चिरडली गेली. त्यातच तिचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे.  दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास तापकीर चौकाजवळ विमलसन्स या कपड्यांच्या दुकानासमोर घडली.

    पिंपरी: पती-पत्नी दोघेजण पत्नीला साडी खरेदी करण्यासाठी दुकानात गेले. पत्नीच्या मनपसंतीची साडी देखील घेतली आणि दोघेजण दुकानाच्या बाहेर गाडी पार्क केलेल्या ठिकाणी आले. त्याचवेळी भरधाव वेगात आलेल्या एका टेम्पोने पत्नीला धडक दिली. टेम्पोच्या मागच्या चाकाखाली सापडल्याने पत्नी चिरडली गेली. त्यातच तिचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे.  दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास तापकीर चौकाजवळ विमलसन्स या कपड्यांच्या दुकानासमोर घडली.

    सुनीता राजेंद्र पारखी (वय ४०, रा. माण, पारखे वस्ती, ता. मुळशी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे पती राजेंद्र लक्ष्मण पारखी (वय ४५) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पो चालक पाराजी दादा भरकडे (वय ३, रा. चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेंद्र आणि त्यांच्या पत्नी मृत सुनीता तापकीर चौकाजवळ असलेल्या विमलसन्स या कपड्यांच्या दुकानात रविवारी दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास साडी खरेदी करण्यासाठी गेले होते. साडी खरेदी करून दोघेही दुकानाच्या बाहेर गाडी पार्क केलेल्या ठिकाणी आले. त्यावेळी आरोपी टेम्पो चालक पाराजी हा त्याच्या ताब्यातील टेम्पो (एम एच १४ / डी जे ५४११) निष्काळजीपणे चालवत आला. टेम्पोने सुनीता यांना धडक दिली. या अपघातामध्ये टेम्पोचे मागील चाक सुनीता यांच्या अंगावरून आणि डोक्यावरून गेले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुनीता यांचा मृत्यू झाला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.