crime

बाणेर कोरोना रुग्णालयातील रुग्णांचे दागिने चोरणारे काळेवाडीत दागिने विक्री करण्यासाठी येणार आहेत, अशी माहिती वाकड पोलीस ठाण्यातील अंमलदार बंदु गिरे व राजेंद्र काळे यांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून त्यांना जेरबंद केले. आरोपी शारदा ही बाणेर जम्बो कोरोना सेंटर येथे गेल्या आठ महिन्यापासून पेशंट केअर टेकर म्हणून कामाला होती.

    पिंपरी: बाणेर कोरोना केअर सेंटरमध्ये रुग्णाच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिला कर्मचाऱ्यासह तिच्या साथीदाराला वाकड पोलिसांनी गजाआड केले. त्यांच्याकडून दागिने जप्त करण्यात आले आहेत. शारदा अनिल आंबिलठगे (वय ३६, रा. गुरुदत्त कॉलनी, रहाटणी फाटा) आणि अनिल तुकाराम संगमे (वय ३५, रा. गंगानवर, रहाटणी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

    बाणेर कोरोना रुग्णालयातील रुग्णांचे दागिने चोरणारे काळेवाडीत दागिने विक्री करण्यासाठी येणार आहेत, अशी माहिती वाकड पोलीस ठाण्यातील अंमलदार बंदु गिरे व राजेंद्र काळे यांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून त्यांना जेरबंद केले. आरोपी शारदा ही बाणेर जम्बो कोरोना सेंटर येथे गेल्या आठ महिन्यापासून पेशंट केअर टेकर म्हणून कामाला होती. या कोरोना सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या एका मृत महिला रुग्णाच्या कानातील सोन्याचे दागिने तिने कटरने कट करुन चोरी केले. ते विक्री करण्यासाठी तिचा साथीदार अनिल याच्याकडे दिले. आरोपी शारदा हिने मृत महिलेसह अनेक रूग्ण महिलांचे सोन्याचे दागिने चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. ही कामगिरी वाकड पोलीस ठाण्याचे तपास पथकातील सहायक पोलिस निरीक्षक संतोष पाटील, अभिजीत जाधव यांच्या पथकाने केली. आरोपींना चतुःश्रृंगी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.