सोसायटीच्या पार्किंगमध्ये महिलेला अडवून केला विनयभंग ; पिंपरीतील धक्कादायक प्रकार

पीडित महिला सोसायटीच्या पार्किंग मधून जात असताना आरोपीने त्यांना थांबवले. तू माझ्यासोबत का बोलत नाही, जर तू मला बोलली नाहीस तर मी तुझे लग्न होऊ देणार नाही. तुझ्या घरच्यांना ही पाहून घेईन. मी तुला सोडणार नाही, अशी धमकी देत महिलेशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

    पिंपरी: सोसायटीच्या पार्किंगमध्ये महिलेला अडवून तिच्याशी गैरवर्तन करत विनयभंग केल्याप्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार विठ्ठलनगर, पिंपरी येथे घडला.

    दीपक काशिनाथ कांबळे (वय ३०, रा. विठ्ठलनगर झोपडपट्टी, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.