खंडीत विजपुरवठ्यामुळे महिलांची पाण्यासाठी वणवण

मंचर : आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक -वरची टाव्हरेवाडी (घुली) येथे गेल्या पंधरा दिवसापासुन वीजपुरवठा खंडीत झाल्याने महिलांना डोक्यावर पिण्यासाठी पाणी वाहुन आणावे लागत आहे.त्यामुळे महिला त्रस्त झाल्या आहेत.

वरची टाव्हरेवाडी (घुली) येथे बुधवार दि.३ रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने वीजपुरवठा खंडीत झाला आहे.त्यांनतर वाडीवस्तीवरील वीजपुरवठा काही प्रमाणात सुरळीत झाला.पुन्हा वीजपुरवठा खंडीत झाला आहे.वीजेचे पडलेले खांब आणि तारा दुरुस्त न झाल्याने थ्रीफेज वीजपुरवठा बंद आहे.त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या योजनेसह शेतीपंपाचा वीजपुरवठा  अद्याप सुरु झाला नसल्याने ऐन पावसाळ्यात महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.सुमारे चाळीस घरांची वस्ती गेली पंधरा दिवस पाण्यापासुन वंचित आहे.पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांसाठी लागणारे पाणीही येथील नागरिकांना डोक्यावर वाहुन आणावे लागत आहे.वीज वितरण कंपनीने लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करावा.अशी मागणी महिलांनी केली आहे.