शिरुर तालुक्यात निसर्गाचा अद्भुत चमत्कार; बोअरवेलमधून उडतेय तब्बल तीस फूट पाणी

सध्या या भागामध्ये पाण्याचा दुष्काळ जाणवत असताना अचानक पुन्हा अतिवृष्टी झालेली असताना पुन्हा या बोअरवेलमधून तब्बल तीस ते चाळीस फूट उंच पाणी उडू लागले आहे. सध्या अशा पद्धतीने पाण्याचे तीस ते चाळीस फुट उंच पाण्याचे फवारे उडू लागल्याने येथे निसर्गाचा अद्भुत चमत्कार घडल्याचे बोलले जात आहे. परिसरातील अनेक नागरिक येथे पाणी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.

  शिक्रापूर : धामारी ता. शिरुर या गावामध्ये निसर्गाचा अद्भुत चमत्कार घडत असून, तीन वर्षांपूर्वी एका शेतकऱ्याने घेतलेल्या बोअरवेलमधून सध्या जास्त पाऊस झाल्याने तब्बल तीस ते चाळीस फुट उंचीवर पाणी उडत असल्याने निसर्गाचा अनोखा चमत्कार घडला असल्याचे बोलले जाऊ लागले असून, अनेक ठिकाणचे नागरिक येथे पाणी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे.

  …अन् उडू लागले तीस फूट पाणी

  धामारी ता. शिरुर येथील डफळापूर येथे अरुण डफळ या शेतकऱ्याने २०१८ साली शेतामध्ये बोअरवेल घेतला असताना त्यांना सदर बोअरवेलला पाणी लागले नसल्याचे दिसून आले. त्यांनतर २०१९ मध्ये परिसरात अतिवृष्टी झाल्याने या बोअरवेलमधून अचानकपणे मोठे पाण्याचे फवारे उडाले होते. सध्या या भागामध्ये पाण्याचा दुष्काळ जाणवत असताना अचानक पुन्हा अतिवृष्टी झालेली असताना पुन्हा या बोअरवेलमधून तब्बल तीस ते चाळीस फूट उंच पाणी उडू लागले आहे. सध्या अशा पद्धतीने पाण्याचे तीस ते चाळीस फुट उंच पाण्याचे फवारे उडू लागल्याने येथे निसर्गाचा अद्भुत चमत्कार घडल्याचे बोलले जात आहे. परिसरातील अनेक नागरिक येथे पाणी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.

  आज देखील येथे पाणी पाहण्यासाठी शिरुर पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष उमाप, जातेगाव बुद्रुकचे उपसरपंच गणेश उमाप, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष किरण ढोकले, शिरुर आंबेगाव विधानसभाचे अध्यक्ष शहाजी डफळ यांसह आदी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या ठिकाणी कायम दुष्काळ असताना सध्या पाण्याबाबत असा प्रकार घडल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत असताना लवकरच या ठिकाणी लवकरच काही ज्येष्ठ भू-जलतज्ञ भेट देणार असल्याचे काही नागरिक व ग्रामस्थ सांगत आहे.

  ‘त्या’ घटनेशी संबंधित घटना

  धामारी येथील डफळापूर येथे १९९७ साली येथील तलावाला भूकंपाचे हादरे बसलेले होते, त्यावेळी तळ्यातील पाणी पुढे काही अंतरावर सापिका वस्ती येथे बोअरवेल शेजारील तळ्याचे पाणी जमिनीखालून निघाल्याची घटना घडलेली असून त्या घटनेशी संबंधित हि घटना असावी असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शिरुर आंबेगाव विधानसभा अध्यक्ष शहाजी डफळ यांनी सांगितले.