सर्व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी केलेले कार्य भावी पिढीला आदर्श  :  न्यायाधीश धनाजी पाटील 

सर्व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून कर्जत शहर आणि परिसरात गेल्या २४५दिवसांपासून स्वच्छता, वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनासाठी हे कार्य सुरू आहे. हे निश्चित एक प्रेरणादायी असून भावी पिढीला एक वेगळा आदर्श यामूळे मिळेल आणि कर्जतची एक वेगळी ओळख यातून निर्माण होईल.सध्या पर्यावरणाचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे. ऑक्सीजनचे काय महत्त्व आहे हे आपण कोरोनाच्या काळात पाहिले आहे.वातावरणातील ओझोनचा स्तर दिवसेंदिवस कमी होत असल्याने चांगल्या भविष्यासाठी पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे.

    कर्जत : कर्जत येथील सर्व सामाजिक संघटनेच्यावतीने जागतिक सायकल दिनानिमित्त कर्जत ते रेहकुरी अभयारण्य अशी सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. यावेळी वृक्षारोपण आणि कर्जत येथील न्यायाधीश धनाजी पाटील यांची बदली झाल्याने त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी पाटील हे बोलत होते. यावेळी न्यायधीश महेश पळसापुरे,नगर पंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव,गटविकास अधिकारी अमोल जाधव,निवृत्त वनाधिकारी अनिल तोरडमल यांच्यासह सर्व सामाजिक संघटनेचे सर्व स्वच्छता, निसर्ग,आणि सायकलप्रेमी उपस्थित होते.

    यावेळी बोलताना पाटील म्हणाले की,सर्व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून कर्जत शहर आणि परिसरात गेल्या २४५दिवसांपासून स्वच्छता, वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनासाठी हे कार्य सुरू आहे. हे निश्चित एक प्रेरणादायी असून भावी पिढीला एक वेगळा आदर्श यामूळे मिळेल आणि कर्जतची एक वेगळी ओळख यातून निर्माण होईल.सध्या पर्यावरणाचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे. ऑक्सीजनचे काय महत्त्व आहे हे आपण कोरोनाच्या काळात पाहिले आहे.वातावरणातील ओझोनचा स्तर दिवसेंदिवस कमी होत असल्याने चांगल्या भविष्यासाठी पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे. हे काम आपण सर्व सामाजिक संघटनांच्या माध्यमातून करत आहात.ही एक चांगली गोष्ट आहे, असे पाटील म्हणाले.यावेळी मुख्याधिकारी गोविंद जाधव,गटविकास अधिकारी अमोल जाधव,सेवानिवृत्त वनाधिकारी अनिल तोरडमल यांची भाषणे झाली.