डोर्लेवाडीत संत तुकाराम महाराज यांच्या पादुकाचे पूजन

बारामती : कोरोनाचे संकट असल्याने पालखी सोहळा पायी जाण्याचा निर्णय शासनाने रद्द केला आहे. यामुळे प्रति देहू समजल्या जाणाऱ्या बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील दिंडीच्या वारकऱ्यांनी जगद्गुरू संत

बारामती : कोरोनाचे संकट असल्याने पालखी सोहळा पायी जाण्याचा निर्णय शासनाने रद्द केला आहे. यामुळे प्रति देहू समजल्या जाणाऱ्या बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील दिंडीच्या वारकऱ्यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पादुकाचे गावातील मंदिरातच पूजन करून पालखी प्रस्थान सोहळा साजरा केला.

डोर्लेवाडी येथे मोठ्या संख्येने वारकरी संप्रदाय असून तो दरवर्षी आषाढी वारीसाठी पंढरपुर येथे वारीसाठी जात असतो परंतु यावर्षी कोरोना संसर्गामुळे आषाढी वारी सोहळा रद्द केला आहे. सर्वाचं दिंड्यानी हा निर्णय मान्य केलेला आहे. शासनाच्या नियमास अधीन राहून हा पालखी सोहळा या वर्षी साजरा होणार आहे. डोर्लेवाडी येथील वैकुंठवासी काळे महाराज दिंडी दरवर्षी या पालखी सोहळ्यामध्ये सामील होत असते परंतु या वर्षी सामील होता न आल्यामुळे दिंडीतील वारकऱयांनी येथील शासनाच्या नियमास अधीन राहून व कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा विचार करून जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे पूजन करून पालखी प्रस्थान सोहळा साजरा केला. शिवाय ज्याप्रमाणे आषाढी वारीचे नियम चालतात त्याप्रमाणे हे वारकरी दररोज सकाळी काकडा भजन आरती, हरिपाठ, करणार आहेत. त्याच बरोबर वृक्षारोपण आदी इतरही सामाजिक उपक्रम राबविणार आहेत.