गाडीचे टायर फुटून झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू

मंचर : आंबेगाव तालुक्यातील मंचर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मंचर -बेल्हेरस्त्यावरील एस कॉर्नर येथे मंगळवार दि.९ रोजी रात्री चारचाकी इको गाडीचा टायर फुटून झालेल्या अपघातात वळती येथील ३१ वर्षीय सचिन

मंचर : आंबेगाव तालुक्यातील मंचर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मंचर -बेल्हेरस्त्यावरील एस कॉर्नर येथे मंगळवार दि.९ रोजी रात्री चारचाकी इको गाडीचा टायर फुटून झालेल्या अपघातात वळती येथील ३१ वर्षीय सचिन वाळुंज याचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे वळती गावावर शोककळा पसरली.  

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार(दि.९) रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास मंचर गावच्या हद्दीत मंचर-बेल्हे रस्त्यावर एस कॉर्नर गणराज मंगल कार्यालयाच्या पाठीमागे इको एम.एच.१२ एच.एन.६९२२ या गाडीचा टायर फुटल्याने अपघात झाला. अपघातात सचिन शांताराम वाळुंज वय ३१ रा.वळती हा ठार झाला आहे. तर त्याच्याबरोबर असलेला त्याचा चुलत भाऊ अशोक वाळुंज किरकोळ जखमी झाला आहे. सचिन वाळूज व अशोक वाळुंज हे इंटर नँशनल स्कुलची इको गाडी घेवुन मंचर येथील चाळीस बंगला येथे पार्कींगला लावण्यासाठी वळती येथुन मंचरकडे जात असताना एस कॉर्नर येथे गाडीच्या डायव्हर साईटचे पुढील व मागील टायर अचानक फुटल्याने गाडी दोन पलटया मारुन रस्त्याच्या कडेला गेली. अपघातात चालक सचिन वाळुंज हा गाडीच्याबाहेर पडल्याने त्याच्या डोक्यास मार लागला होता. त्याला रुग्णवाहिकेतुन मंचर उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासुन तो मयत झाल्याचे सांगितले. याबाबत अशोक वाळुंज यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस जवान सचिन देशमुख हे करीत आहेत.