suicide

पुण्यामध्ये रोज कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. अनेकांनी गेल्या काही महिन्यात आपली नोकरी गमावली आहे.  अनेकांच्या उद्योगावर परिणाम झाला आहे. कोरोना आणि बेरोजगारीमुळे अनेकांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. पुण्यातील(pune) सहकारनगर भागामध्ये एका तरुणाने आत्महत्या(suicide) केल्याची घटना समोर आली आहे.

सहकारनगरमधील(sahakarnagar) एका तरुणाला कोरोनाची लागण झाली होती. त्यामधून तो बराही झाला. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला होम क्वारंटाईनचा सल्ला दिला. मात्र या होम क्वारंटाईन काळात हा तरुण निराश होत गेला आणि गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. या बातमीनंतर एकच खळबळ उडाली आहे.

संदीप  भोसले असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सहकारनगरमध्ये संदीप भोसले आपल्या कुटुंबासोबत राहत होते. संदीप यांच्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. काही दिवसांनी संदीप यांना कोरोनाची लागण झाली त्यामुळे संपूर्ण कुटुंब चिंतेत होते. मात्र संदीप कोरोनामधून बरे झाले. डॉक्टरांनी त्यांना होम क्वारंटाईनचा सल्ला दिला. संदीप पद्मावती येथील ओमकार सोसायटीत राहत होते. त्यांनी पत्नी आणि मुलांना सासरी सोडले. दरम्यान, संदीप यांचा भाऊ सकाळी नाष्टा घेऊन आल्यावर संदीपने आत्महत्या केल्याचे दिसून आले. आत्महत्येचे कारण नैराश्य असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.