रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आलेल्याकडून तरुणीचा विनयभंग

तरुणी येवलेवाडी भागात राहते. तरूणीच्या शेजारी राहणाऱ्या कुटूंबाने रस्ता खराब असल्याने खडी टाकण्यास सांगितले होते. त्यानुसार, येथे खडी टाकण्याचे काम काही लोक करत होते. यादरम्यान, येथे खडी टाकण्यास सांगणारी व्यक्ती येथे हजर नव्हती. परंतु, त्यांच्याकडे काम असल्याने या आरोपींनी या तरूणीला त्यांना निरोप देण्याच्या बहाण्याने तरुणीचा मोबाइल क्रमांक घेतला.

    पुणे : रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आलेल्याने या परिसरात राहणाऱ्या तरुणीचा मोबाइल क्रमांक घेऊन तिला सतत फोन करून अश्लील व्हिडीओ पाठवून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात २५ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानुसार, दोन मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ६ ते १० ऑक्टोंबर या कालावधीत घडला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी येवलेवाडी भागात राहते. तरूणीच्या शेजारी राहणाऱ्या कुटूंबाने रस्ता खराब असल्याने खडी टाकण्यास सांगितले होते. त्यानुसार, येथे खडी टाकण्याचे काम काही लोक करत होते. यादरम्यान, येथे खडी टाकण्यास सांगणारी व्यक्ती येथे हजर नव्हती. परंतु, त्यांच्याकडे काम असल्याने या आरोपींनी या तरूणीला त्यांना निरोप देण्याच्या बहाण्याने तरुणीचा मोबाइल क्रमांक घेतला. मात्र, त्यानंतर आरोपींनी या तरुणीला फोन करून कुठे आहेस, घरी आहेस का, अशी विचारणा केली. तरुणीने याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, १० ऑक्टोबरला आरोपींनी तरुणीच्या मोबाइलवर अश्लील व्हिडीओ पाठवून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. त्यानंतर तरुणीने पोलीसांकडे धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक समाधान मचाले करत आहेत.